पंढरी वार्ता:-लिंकरोडवरील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक लक्षात घेवून स्पिड ब्रेकर करा -सुधीर भोसले



प्रबोधनकार ठाकरे चौक ते क्रांतीवीर नाना पाटील चौक हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावरुन मोठया प्रमाणात अवजड वाहनांसह  इतर वाहनांचीही वर्दळ असते.त्याच बरोबर या रस्त्यावरून ही वाहने सुसाट जात असल्याने या रस्त्यावरुन जात असलेल्या विद्यार्थ्यांना व वृध्द व महीलांना अक्षरश: जिव मुठीत धरुन हा रस्ता पार करावा लागत आहे.या परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेवून येथील देशमुख पेट्रोल पंपाजनिक इंग्लीश मिडीयम स्कूलकडे जाणार्‍या रस्त्यानजिक तातडीने स्पिड ब्रेकर तयार करावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे के ली आहे.
     पंढरपूर शहरातील लिंक रोड वरील अवजड वाहनांची वाहतूक हा नेहमीच वादाचा विषय झाला आहे.वाहतूक शाखेने या ठिकाणाहून जडवाहतूकीस बंदी घातलेली असली तरी अनेक वेळा माहीती अभावी वाहने या रस्त्यावरुन जाताना दिसून येतात.या रस्त्यावर शासकिय विश्रामगृह नजिक व महावितरण कार्यालयासमोरील रस्त्यावर स्पिड ब्रेकर करण्यात आले आहेत.त्याच प्रमाणे देशमुख पंपाशेजारी इग्लीश मिडीयम कडे जाणार्‍या जोडरस्त्यानजिक स्पिड ब्रेकर करावा ही नागरिकांची मागणी लक्षात घेवून हे निवेदन देण्यात आले असल्याची माहीती सुधीर भोसले यांनी केली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव