पंढरी वार्ता :-चळे येथील आभ्यासिकेसाठी आ.रामहरी रुपनर यांना निवेदन
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमनगर येथील लोकसंख्या 2011 च्या जणगणने नुसार 870 आहे.ठिकाणी अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी वास्तव्यास आहेत.राज्यशासनाने दलीतवस्तीच्या ठिकाणी अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे धोरण कॉग्रेसच्या सत्ताकाळातपासून अमलात आणले आहे.या योजनेअर्तंगत चळे येथील भीमनगरमध्ये अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करुन अभ्यासिकेची उभारणी केल्यास अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.भीमनगरच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्नासाठी युवक कॉग्रेेेसचे तालुका उपाध्यक्ष समाधान रोकडे यांनी आ.रामहरी रुपनर हे सोलापूर येथे आयोजीत जिल्हा कॉग्रेस कमेटीच्या बैठकीवेळी आले असता त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत बोलताना आ.रामहरी रुपनर म्हणाले की,चळे येथील अभ्यासिकेबाबतची ही मागणी अतिशय रास्त असून या अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करु व निधी उपलब्ध करुन देवू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.हे निवेदन देताना कॉग्रेस प्रणित ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी,जिल्हा सरचिटणीस अमर सुुर्यवंशी.पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,पंढरपूर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे,शिवाजी धोत्रे,ज्येष्ठ कार्यकर्ते मामा फलटणकर,प्रा.अशोक डोळ,प्रा.मारुती भोसले,बाळासाहेब आसबे आदी उपस्थित होते.
