पंढरी वार्ता :- शिक्षण उपसंचालकांकडे वाद प्रलंबीत असताना रा.म. साठेंची पत्रकबाजी -दत्तात्रय गायकवाड
विद्यामंदीर गार्डी या शाळेत रा.म.साठे हे 1994 पासून कार्यरत आहेत.संस्थेमध्ये सर्वजातीधर्माचे कर्मचारी अतिशय आपुलकीने ज्ञानदानाचे काम करीत असताना अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे.रा.म.साठे यांनी यापुर्वीही संस्थेमध्ये चुकीचे वर्तन केले होते.साठे यांना 4 अपत्ये असताना दोन अपत्ये दाखवून दिनांक 20 नोव्हेंबर 2010 रोजी वडीलांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या बीलापोटी शासनाकडून 17 हजार 440 रुपये एवढ रक्कम प्राप्त केल्यानंतर आम्ही त्यांना शासनाच्या 28 नोव्हेंबर 2000 च्या शासन निर्णयानुसार हे बील प्राप्त करणे बेकायदेशीर आहे व शासनाची फसवणूक करीत आहात याबाबत समज दिली होती.मात्र हे बील शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर रा.म.साठे यांनी पुन्हा 19 डिसेंबर 2015 रोजी शासनाकडे पुन्हा दिशाभूल करणारे कागद पत्रे सादर करुन 1 लाख 68 हजार 398 रुपये इतक्या वैद्यकिय बीलाची मागणी केली होती.त्यास मुख्याध्यापक आणि संस्थेने संमती नाकारल्याने शिक्षणअधिकारी व राजकीय संघटनांकडे त्यावेळी रा.म.साठे यांनी दाद मागीतली होती 26 जानेवारी 2016 रोजी हे बील मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. शिक्षणाधिकारी यांनी सुणावणी घेवून साठे यांचे बील नामंजूर केल्यानंतर शासनाच्या आदेशाच्या विरोधात जावून संस्थेने सहकार्य केले नाही व या बाबत संस्थेने दाखल केलेला दावा रे.मु.नं.566/2016 अद्याप प्रलंबीत आहे.या आकसापोटी साठे हे सातत्याने संस्थेची बदनामी करीत आहेत.मुख्याध्यापक पदासाठी सेवाजेष्ठतेच्या निकषानुसार रा.धो.भोसले हे पात्र असतानाही मुख्याध्यापक पदाच्या खुर्चीवर मीच बसून दाखवतो अशी वल्गणा करीत साठे यांनी संस्थेचे माजी उपाध्यक्ष संपत लक्ष्मण जाधव यांना हाताशी धरुन त्यांच्या सहीने शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे मुख्याध्यापकपदाचा प्रस्ताव सादर करुन दिशाभूल करुन मंजूरीचा आदेश घेतला मात्र संस्थेेने याबाबत तात्काळ शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दिनांक 19 डिसेंबर 2017 रोजी अपील दाखल केले आहे व ते अद्याप प्रलंबीत आहे.अशी माहीती या संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय प्रकाश गायकवाड यांनी दिली आाहे.
गार्डी विद्यामंदीर या शाळेस बदनाम करण्याचा डाव रा.म.साठे यांनी मांडला असून वास्तविक पाहता प्रसिद्धी पत्रकादवारे त्यांनी केली आहे.सहशिक्षक म्हणून साठे हे काम करीत असताना आम्ही त्यांना यापुर्वीही कधी अटकाव केला नाही व पुढेही करण्याचा प्रश्न उदभवत नाही मात्र केवळ आकसापोटी संस्थेस बदनाम केले जात असेल तर साठे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याशिवाय संस्थेसमोर पर्याय उपलब्ध नसल्याचेही संस्थाध्यक्ष श्री गायकवाड यांनी म्हटले आहे.पुरेशा शिक्षकांअभावी शाळेचा दर्जा खालावल्याचा रा.म.साठे यांचा आरोप चुकीचा व हास्यास्पद असून संस्थेने 2012 पासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे चार कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली आहे.व शाळेची प्रगती समाधानकारक आहे.त्यामुळे शाळेच्या बदनामीचा प्रयत्न साठे यांनी करु नये असेही आवाहन श्री गायकवाड यांनी केले आहे.

