पंढरी वार्ता:- ‘विठ्ठल’च्या वजनकाट्याची भरारी पथकाकाकडून भररात्री तपासणी ! काटा योग्य असल्याचा दिला निर्वाळा
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि वेणुनगर पंढरपूर कारखान्यातील ऊस वजन काटे तपासणी महाराष्ट्र शासन नियुक्त भरारी पथकाच्या सदस्यांकडून करण्यात आली. यावेळी भरारी पथक येण्यापूर्वी वजन केलेली वाहने गव्हाणी वरुन परत आणुन ङ्गेर तपासणी करण्यात आली व ऊस भरलेली बैलगाडी, डंपिंग वाहने तपासण्यात आली. भरारी पथकात पंढरपूरचे वैधमापन निरीक्षक कुंभारसाहेब, तहसील पूरवठा आधिकारी जी के वानखडे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्री समाधान ङ्गाटे,लेखापरीक्षक शिंदे, पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते. कोणत्याही वजन काट्यावर ङ्गरक आढळून आला नाही, सर्व वजने बरोबर असलेचा लेखी अहवाल देणेत आला आहे.
ऊसदर आंदोलनाच्या निमित्ताने साखर कारखान्यांकडून काटामारी केली जात असल्याचा आरिेप मोठया प्रमाणात होत होता.मात्र हा आरोप सिध्द करावा असे आवाहन साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडून वारंवार केले जात होते.राज्य शासनाच्या वतीने साखर कारखान्यांच्या काटे तपासणीसाठी भरारी पथकाची घोषणा केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही हे पथक कार्यरत झाले असून काल रात्री या पथकाने विठ्ठलच्या वजनकाट्यावर येवून वजन केलेली वाहने परत बोलावून खात्री केल्याचे दिसून आले.