पंढरी वार्ता:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागास धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कारवाईचे अधिकार द्या-द.बडवे

 भाविकांना पैसे घेवून दर्शनास सोडले जात असेल तर ते बेकादेशीर असण्याबरोबरच श्रध्देने रांगेत दर्शनासठी थांबलेल्या भाविकांवर अन्यायकारक आहे.भाविकांकडून पैसे घेवून दर्शनास सोडले जात असेल तर हा लाच घेण्याचाच प्रकार असून त्यामुळे भाविकांच्या तक्रारींवर मंदीरात कारवाई करण्याचे अधिकार लाच लुचपत खात्यास प्रदान करावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे फॅक्सद्वारे केली असल्याची माहीती कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष द.बडवे यांनी दिली आहे.
    शासनाच्या व धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने आहेत.नाताळाच्या सलग सुट्टयांच्या काळात राज्यभरातील अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. या काळात अनेक मंदीरांमध्ये मोठया प्रमाणात वशिलेबाजीने दर्शनास सोडण्याचे प्रकार घडल्याचे निदर्शनास येत असुन हे धार्मिक स्थळे पुवि पुजार्‍यांच्या ताब्यात होती तेव्हाही असे प्रकार घडल्याच्या आरोपाखाली तक्रारीही झाल्या होत्या.मात्र पुढे धार्मिक स्थळे शासनाने अधिग्रहीत केल्यानंतर अधिकारप्राप्त व्यक्तीही मंदीरांच्या ठिकाणी भ्रष्टाचार करु लागल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळेच अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी करण्यात येणार्‍या भ्रष्ट वर्तनावर कारवाई करण्याचे अधिकार लाचलूचपत विभागास द्यावेत अशी मागणी आपण केली असल्याची माहीती द.बडवे यांनी दिली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव