पंढरी वार्ता:- युवा उद्योजक अभिजीत पाटील यांनी साखर कारखानदारांसमोर ठेवला नवा आदर्श ! जि.प.शाळेतील 11 मुलींच्या हस्ते 1,11,111 व्या साखर पोत्यांचे पुजन !

राज्यभरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मध्यावर आलेला असून अनेक साखर कारखाने विविध मान्यवरांच्या हस्ते साखर कारखान्यामध्ये उत्पादीत झालेल्या साखरेच्या पोत्याचे पुजन करताना दिसून येतात.पंढरपूरचे युवा उद्योजक अभिजीत पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशीव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यामातून एका नव्या आव्हानात्म क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. या कारखान्यामध्ये उत्पादीत झालेल्या पहील्या साखर पोत्याचे पुजन आई्रसाहेबांच्या हस्ते करुन त्यांनी आपल्या मातृभक्तीचा परिचय करुन दिला होता.तर आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रिय दिनाचे औचित्य साधत या साखर कारखान्यात निर्मिती झालेल्या 1 लाख 11 हजार 111 व्या साखर पोत्याचे पुजन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणार्‍या 11 विद्यार्थिनींच्या हस्ते करुन त्यांनी या सुकन्यंाचा गौरव केला आहे.
        युवा उद्योजक अभिजीत पाटील यांनी विविध व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत असतानाच आपल्या सामाजिज बांधीलकीचा प्रत्यय अनेक वेळा दिला आहे.धाराशिव सहकारी साखर कारखान्याच्या माद्यमातून त्यांनी या कारखान्याच्या परिसरातील अनेक शाळा,सामाजिक संस्था तसेच विधायक उपक्रमांना नेहमीच सहाय्य केले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विशेषत: विद्यार्थीनींसाठी त्यांनी या भागात विशेष सहकार्य करण्याचेही कर्तव्य पार पाडले आहे.मात्र आज 11 विद्यार्थिनींच्या हस्ते साखर पोत्यांचे पुजन करुन त्यांनी राज्यभरातील साखर कारखानदारांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.या अभिनव उपक्रमाबद्दल अभिजीत पाटील व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन केले जात आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव