पंढरी वार्ता:- 25 टक्के राखीव कोटयातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास शाळांची मान्यताच रद्द ! बडया संस्था चालकांना धडा शिकविण्यासाठी शासनाचा आदेश

अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शिक्षण संस्थामध्ये  25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र या सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर अनेकवेळा संस्थाचालक शिक्षणाधिकार्‍यांना हाताशी धरून आधीच प्रवेशाची यादी निश्‍चित करतात व आम्ही हा कोटा पुर्ण केला आहे अशी उत्तरे देवून रिकामे होतात. यावर्षी मात्र ही प्रक्रिया
सुलभ व्हावी या उद्देशाने शासनाने 16 जानेवारी रोजी निर्णय जाहीर करून प्रक्रिया कशी असेल याबाबत स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या शाळांनी पोर्टलवर नोंदणी न केल्यास,अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांला कोणतेही कारण नसताना प्रवेश नाकारल्यास,पालकांनी शाळा प्रवेश देत नाही अशी तक्रार केल्यास शिक्षणाधिकारी तपासणी करून तक्रारीत तथ्य आढल्यास शाळेवर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
      अर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षीत 25 टक्के जागांसाठीच्या प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, किती ङ्गेर्‍या घेतल्या जातील याबाबतही निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी ऍप विकसित केले जाणार आहे. याबाबत एनआयसीला सूचित करण्यात आले आहे. या ऍपच्या माध्यमातून पालकांना प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती तसेच त्यांच्या परिसरातील शाळांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया सुलभ पार पडेल अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान प्रवेशाची इयत्ता ही शाळानिहाय पहिली किंवा पूर्व प्राथमिक ठरविली जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव