पंढरी वार्ता:-एकच कामगार कल्याण अधिकारी ! जिल्हाभर तपासणीची जबाबदारी ! पंढरपूर शहर व तालुक्यातील 3 हजार आस्थापनांच्या तपासणीचे शिवधनुष्य पेलणार ?

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अनुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील दुकाने,व्यवसायीक आस्थापना,संस्था व कारखाने यांच्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांच्या कल्याणसाठी विविध योजनार राबविण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र कामगार कल्याण विभागाची स्थापना केली.या विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि नसलेल्या वर नमूद केलेल्या सर्वच आस्थापना मधील नियमीत,हंगामी,कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबास मदत करता यावी या हेतूने कामगार आणि मालक वर्गंणी आणि शासनाचे अंशदान अशा स्वरुपात निधी उपलब्ध करुन योजना राबविल्या जातात.पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक खाजगी व्यवसायीक आस्थापनामध्ये मोठया संख्येने अल्पवेतनावर कुठलीही शाश्‍वती अथवा नोकरीची हमी नसताना वेळेचे बंधन झुगारून हजारोंच्या संख्येने कामगार काम करीत असलेले दिसून येतात.मात्र संपुर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी केवळ एकच कामगार कल्याण अधिकारी आहेत तर या कार्यालयाचे कार्यक्षेत्र संपुर्ण सोलापूर जिल्हा असतानाही हाताच्या बोटावर मोजता येईल इतकाच कामगार वर्ग आहे.त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील खाजगी आस्थापनामध्ये काम करणार्‍या कामगारांचे कल्याण होणार का ? असाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे.आमदार भारत भालके यांनी पंढरपूर शहरात कामगार कल्याण चे विभागीय कार्यालय व्हावे अशी मागणी  केली होती.त्यावेळी कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी लवकरच या बाबत निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन दिले होते.आता  या कार्यालयासाठीचा प्रस्तावही सोलापूर विभाकडून पाठविण्यात आलेला आहे मात्र निर्णय झालेला नाही.
                 पंढरपूर शहर व तालुक्यात कारखाने अधिनियम 1948/दुकाने व आस्थापना अधिनियम 1948,मोटार वाहतूक कामगार अधिनियम 1961,लघुद्योग प्रमाणपत्र धारक,केंद्र व राज्य सरकार परवाना पात्र कंत्राटी कामगार ठेकेदार,यांच्यासह जिथे 5 पेक्षा जास्त कामगार काम करतात असे सर्व दुाकने यांनी राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाकडे स्वतंत्र नोंदणी करून 15 जानेवारी पुर्वी वर्गणी भरणे बंधनकारक आहे.व विहीत केेलेल्या रकमेचा भरणा न केल्यास दंड किवा शिक्षेचीही तरतूद आहे.प्रत्येक नोंदणीकृत व्यवसायीकाने 3 हजार रुपयापर्यत वेतन घेणार्‍या कामगाराची प्रतिकामगार दरमहा 24 रुपये तर 3 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणार्‍या कामगाराची प्रत्येकी 48 रुपये प्रमाणे मालक वर्गणी म्हणून  शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे 15 जानेवारी 2018 पर्यंत जमा करणे बंधणकारक आहे.
       पंढरपूर शहर व तालुक्यातील व्यवसायीक आस्थापनामधील प्रत्यक्ष कामगार संख्येची,त्यांच्या वेतनाची व त्यांना दिल्या जाणार्‍या सोई सुविधांची तपासणी करण्याचे अधिकार व वंधन कामागार कल्याण अधिकारी सोलापूर यांच्यावर आहे.या बाबत पंढरी वार्ताने जिल्हा कामगार कल्याण अधिकारी श्री धस यांच्याशी संपर्क साधला असता 15 जानेवारी पर्यंत वर्गणी भरणे गरजेचे आहे.मात्र या आस्थापनांची तपासणी आम्ही आगामी काळात करणार आहोत अशी माहीती दिली.पंढरपूर शहर व तालुक्यातील व्यवसायीक आस्थापनांची संख्या पाहता ही तपासणी मोहीम राबविणे म्हणजे एक दिव्यच ठरणार आहे.
    अत्यल्प वेतनावर,कुठलेही संरक्षण नसताना,वेळेची मर्यादा नसताना राबणार्‍या कामगारांना विविध कल्याणकारी योजना राबविण्याच्या हेतूने शासनाने कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली मालक वर्गणीत शासन आपले अंशदान जमा करुन या योजना राबविते.आणि यासाठी जिल्हा कामगार कल्याण कार्यालयाची भुमिका अतिशय महत्वाची आहे.त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील तपासणी मोहीम काटेकोर पध्दतीने होणे गरजेचे आहे.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव