पंढरी वार्ता:- भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण रस्ता रुंदीकरणाच्या नोटीसा निघाल्या ! शहराच्या पहील्या विकास आराखडयातील कामास 40 वर्षांनी मुहुर्त ?

सोलापूरसह मराठवाडा,विदर्भ,कर्नाटक,आंध्रपदेश आदी ठिकाणाहून येणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी पंढरपूर शहरात प्रवेश करण्याचा मुख्य आणि एकमेव मार्ग असलेल्या अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होते.1967 साली तयार करण्यात आलेल्या पंढरपूर शहराच्या पहील्याच विकास आराखडयात या कामाचा समावेश होता.या ठिकाणचा रस्ता अतिशय अरुंद असून बाराभाई तालीम चौक ते भाई मुरलीधर थोरात चौक हा रस्ता तर केवळ आठ फूट रुंदीचा आहे.या रस्त्यावर एकजरी चारचाकी वाहन आले तरी दोन्ही बाजूकडे वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दृश्य नित्याचे होते.तर पंढरपूर शहरात प्रवेश करताच या अतिअरुंद रस्त्याच्या ट्राफीक जाममध्ये फसलेल्या भाविकांकडून देशातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणच्या या परिस्थीतीबद्दल नाराजी व्यक्त होत होती.शहरातील प्रदक्षिणामार्गासह इतरही मार्गाचे रूंदीकरण झाले मात्र या रस्त्याचे काम हाती घेण्यात राजकीय अडथळा हेच मोठे कारण ठरले होते.मात्र तात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे 65 एकराचा परिसर विकसीत करण्यासाठी या भागातून वारंवार जाताना त्यांना या प्रमुख रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज लक्षात आली होती.हे काम त्वरेने पुर्ण केले जावे अशा सुचनाही त्यांनी केल्या होत्या.
        भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे जवळपास 140 मालमत्ताधारक बाधीत होत आहेत.मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या बाबतीत गेल्या काही वर्षात बर्‍याच मोठया घडामोडी घडल्या आहेत.त्यामुळे राजकीय घडामोडीच्या बाबतीत हा रस्ता व्हिआपी रस्ता ठरला आहे.1967 साली टाउन प्लानिंक आफीसर सोलापूर कार्यालयाने पंढरपूर शहराचा पहिला विकास आराखडा तयार केला त्यामध्ये इतर विकास कामांबरोबरच शहातील प्रदिक्षीणा मार्ग,चौफाळा ते पश्‍चिमद्वार,नामदेव पायरी ते महाद्वार,चौफाळा ते शिवाजी चौक,काळा मारुती ते पश्‍चिमद्वार व काळा मारुती ते चौफाळा,भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण,भजनदास चौक ते विठ्ठल मंदीर या प्रमुख व अत्यावश्यक रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम प्रस्तावीत केले होते.1967 साली शासनास सादर झालेल्या या विकास आरखाडयाची अंमलबजावणी करण्यास प्रत्यक्षात 1980 चे दशक उजाडले.पंढरपूर नगर पालीकेच्या प्रशासकपदी आलेले आय.ए.एस.अधिकारी रमानाथ झा यांनी अतिशय धाडसाने हा विकास आराखडा राबविण्याचा निर्णय घेतला.सर्वात महत्वाचा रस्ता असलेल्या चौफाळा ते पश्‍चिमद्वार व महाद्वार ते नामदेव पायरी या रस्त्याचे रुंदीकरण करु  नये यासाठी भागातील प्रस्थापीतांचा व राजकीय दबाव फार मोठा होता.मात्र हा दबाव झुगारुन नगरपालीकेचे प्रशासकज रमानाथ झा यांनी या रस्तग्यांचे रुंदीकरण केले होते.या कामानंतर उत्तरद्वार ते भजनदास चौक आणि भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण हा रस्ता शहरात प्रवेश करणार्‍या वाहनांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे हे लक्षात रमाकांत झा यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत पावले उचलण्यास सुरुवात केेली मात्र तात्कालीन आमदार स्व.पांडुरंग डिंगरे आणि या परिसरातील प्रस्थापीतांचा मोठा दबाव आल्याने रमाकांता झा यांची बदली झाली.त्यामुळे उत्तरद्वार ते भजनदास चौक आणि भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण जे पुर्वी लोकमान्यविद्यालयाचे क्रिडांगण म्हणून नगर पालीकेकडे नोंद केलेले होते.या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले.या अतिअरुंद रस्त्यावरुन रोज अनेक आजी माजी आमादर,खासदार,मंत्री,व्हिआयपी शहरात प्रवेश करीत होते.अरुंद रस्त्यामुळे ट्राफीक जाममध्ये अडकत होते.परंतू इच्छाशक्तीच्या अभावामुळे थेट विठ्ठल मदीराकडे घेवून जाणारा हा रस्ता 40 वर्षे रखडला होता.
        आता या रस्त्याचे 12 मिटर रुंदीकरण केले जाणार असून 1967 च्या मुळ आराखड्यात 9 मिटर रुंदीकरण प्रस्तावीत असलेला हा रस्ता 2006 च्या विकास आराखडयात 15 मिटर रुंद करण्याचे प्रस्तावीत करण्यात आले.पुढे पुन्हा हा रस्ता 12 मिटर रुंदीकरण करण्यासाठी राजकीय पातळीवर झालेल्या घडामोडी हा स्वतंत्र आर्टीकलचा आणि अतिशय गंभीर विषय आहे आहे.आणि तो आम्ही स्वतंत्र आर्टिकलद्वारे मांडणार आहोतच.तुर्तास आपल्या बाधीत क्षेत्राची नुकसान भरपाई घेवून जावा अशा नोटीसा प्रांत कार्यालयाने पाठविल्या असून या रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव