पंढरी वार्ता:- आ.भारत भालकेंचा मोहोळ विधानसभा मतदार संघातील जनतेला दिलासा ! रांझणी -ओझेवाडी-सरकोली रस्त्यासाठी 6 कोटी 43 लाखांचा निधी मंजूर !
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार या नात्याने आपण या मतदार संघातील रस्त्यासाठी 9 कोटी 43 लाखांचा निधी मंजूर करण्याचा दावा आ.भारत भालके यांनी केला असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील रांझणी ते ओझेवाडी,सरकोली या रस्त्यासाठी 6 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.मोहोळ विधानसभा मतदार संघात बहुतांश समावेश असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावाही आ.भारत भालके यांच्याकडून करण्यात आला आहे.
मंगळवेढा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आ.भारत भालके यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली होती.संजय शिंदे हे विकास कामांसाठी निधी देण्याबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोपही आ.भारत भालके यांनी केला होता.पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात आ.भारत भालके -कल्याणराव काळे समर्थक जि.प. व पंचायत समिती सदस्य हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या निधीबाबत मौन बाळगून असताना आ.भारत भालके यांनी थेट जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना टार्गेट केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.रस्त्याच्या 9 कोटी 43 लाखांच्या मंजूर निधीपैकी बहुतांश निधी हा रांझणी ते सरकोली,ओझेवाडी या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.व हा भाग बहुतांश रित्या
मोहोळ मतदार संघात येत असल्यामुळे मोहोळ मतदार संघात समाविष्ट असलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.