पंढरी वार्ता:- गणेश नगर,परदेशी नगर रेल्वे स्थानक परिसरात नव्या पाईपलाईनसाठी 73 लाखांचा निधी उपलब्ध ! नगरसेवक विवेक परदेशी यांच्या पाठपुराव्यास यश
पंढरपूर शहरातील आतिशय दाट लोकवस्ती असलेल्या गणेश नगर,परदेशी नगर,येळेवस्ती,रेल्वे स्थानक परिसरातील पिण्याच्या पाईपलाईन बदलण्यात याव्यात यासाठी नगरसेवक व नगर पालीका शिक्षण मंडळाचे सभापती विवेक परदेशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन या परिसरातील अनेक उपनगरांना पाणी पुरवठा होत होता.मात्र परिसरातील अनेक पाईपलाईन बदलण्याची गरज निर्माण झाली होती.या बाबत नगरसेवक विवेक परदेशी यांनी आ.प्रशांतराव परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करुन येथील नागरिकांच्या या महत्वपुर्ण प्रश्नास न्याय मिळवून दिला आहे.
गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन परदेशी नगर,येळेवस्ती,माळीवस्ती,बालाजी नगर,अन्नपुर्णा नगर,पुंडलीक नगर,रेल्वे वसाहत,गुरुकृपा हौसींग सोसायटी आदी भागास पाणी पुरवठा केला जातो.येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागात अधिक व्यासाच्या व काही ठिकाणी नविन पाईपलाईन टाकणे गरजचे होते.त्यामुळे सर्वच नळकनेक्शन धारकांना समान दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा करणे सुलभ होणार होते.येथील नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी नगरसेवक विवेक परदेशी यांनी पाठपुरावा केल्याने 73 लाख 11 हजार 412 रुपये खर्चाच्या नव्याने पाईपलाईन टाकण्याच्या कामास निधी उललब्ध झाला आहे.या कामाच्या निविदा निघाल्या असून एक वर्षभराच्या कालावधीत हे संपुर्ण काम पुर्ण होणार आहे.
गेल्या अनेक वर्षाच्या मागणीस नगरसेवक विवेक परदेशी यांनी न्याय मिळवून दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.