पंढरी वार्ता :- शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत २६ जानेवारीस संविधान बचाव लाँग मार्च !

26 जानेवारी रोजी मुंबईत शरद पवार, शरद यादव, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल, गणेश देवी, बी जी कोळसे पाटील यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक व संविधानप्रेमी यांच्यातर्फे संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन करत लाँग मार्च  काढला जाणार आहे. 
  मुंबईत मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापासून ते गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून हा संविधान बचाव मार्च काढला जाणार आहे.या लाँग मोर्चाचे कोणीही नेतृत्त्व करणार नाही.संविधानप्रेमी हा संविधान बचाव सत्याग्रह लाँग मार्च काढत आहोत .  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव