पंढरी वार्ता:- रामबागेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या निरिक्षकास सोलापूरचे पुढारी राजन जाधव यांनी रोखले ! मुख्य प्रवेशद्वार दगड आडवे लावून बंद केले ! धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे पथक रिकाम्या हाताने परतले !
पंढरपूरातील एकेकाळी नामवंत व मोठी संस्था म्हणून गणल्या गेलेल्या रामबाग संस्थेची शेकडो एकर जमीन पंढरपूर तालुक्यात आहे.तर शहरात या संस्थेच्या मालकीची अब्जावधीर रुपये किमतीची जागा आहे.त्याच बरोबर देवाचे वस्त्रअलंकार आहेत.मात्र गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेची अवस्था अतिशय बकाल झाल्याचे दिसून येत होते.रामबाग म्हणून गणल्या गेलेल्या या जागेचा अक्षरश हागणदारी म्हणून उपयोग होताना दिसून आला.कासेगाव येथे याच संंस्थेची जवळपास दोनशे एकर जमीन आहे तर आढीव आणी वाखरी परिसरातही शेकडो एकर जमीन आहे.मात्र या संस्थेच्या विश्वस्तांनी गेल्या कित्येकवर्षात या संस्थेची अर्थिक स्थिती अतिशय भक्कम असतानाही जी दुरावस्था केली होती यामागे या संस्थेच्या विद्यमान विश्वस्तांना नक्की काय हेतू होता हे एक गौडबंगालच होते.पंढरी वार्ताच्या माध्यामतून गेल्या काही महिन्यात या संस्थेबाबत सातत्याने बातम्या प्रकाशित करुन धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे तसेच संस्थेशी संबधीत सर्व देणगीदार,हितचिंतकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम आम्ही केले होते.याची दखल घेत धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून या संस्थेच्या निलंबीत विश्वस्तांकडून संस्थेचा तातडीने ताबा घेण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निरिक्षक महादेव जावळे,श्री क्षिरसागर व श्री शिंदे
हे आज येथे आले होते.मात्र ते येण्यापुर्वीच रामबागेचे खुले असणारे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले त्यामुळे त्यांना पाठीमागील बोळाने रामबागेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा लागला.मात्र या संस्थेचे विद्यमान विश्वस्त नसलेले परंतू निलंबीत विश्वस्तांच्या माध्यमातून धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केलेल्या चेंज रिपोर्ट नुसार रामबागेचे विश्वस्त असल्याचे सांगत सोलापूरचे पुढारी राजन जाधव यांनी आम्हास संस्थेचा ताबा घेण्यापासून रोखले आहे असा शेरा मारत हे पथक रिकाम्या हाताने परतले आहे.
या संस्थेचा प्रशासक म्हणून ताबा मिळावा अशी दरखास्त विठ्ठलदास पन्नालाल मुंदडा व इतर यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केली होती.त्यावर सुनावणी घेतल्यानंतर संस्थेचे निलंबीत विश्वस्त व सोलापूरचे उद्योगपती आर.आर.राठी,एच.एम.झंवर,सचिन देशपांडे,अलोक विजयकुमार भैय्या,भिमराव आबासाहेब किल्लेदार,एम.एस.कुलकर्णी यांना धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून 27 डिसेंबर 2017 रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे दिले होते.मात्र एकही विश्वस्त उपस्थित न राहील्याने धर्मदाय सहआयुक्त पुणे यांनी निर्णय देत संस्थेवर दोन वर्षे कालावधीसाठी प्रशासकिय विश्वस्त व्यवस्था अस्तित्वात आणली होती.या संस्थेच्या निलंबीत विश्वस्तांकडून संस्थेचे प्रोसेडिंग बुक,जंगम मालमत्ता रजिस्टर,संस्थेची सोन्याचांदीची आभुषणे,चेकबुक आदी ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्यासाठी व संस्थेचा ताबा घेण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाने पाठविलेल्या पथकाची वाट संस्थेचे मुख्य प्रवेशद्वार दगडांचा आडोसा टाकून बंद करुन रोखली होती.संस्थेच्या मागील गेटवर सोलापूरचे राजन जाधव आणि त्यांच्या सोबत सोलापूर आलेले शेकडो कार्यकर्ते व विशस्त किल्लेदार हे थांबले होते.या रस्त्याने रामबागेत प्रवेश करु पाहण्यार्या धर्मदाय आयुक्त निरिक्षकास त्यांनी तेथेच थांंबवले व मी या संस्थेचा ट्रस्टी आहे मी आपणास कारवाई करु देणार नाही असे सुनावत रामबागेत प्रवेश नाकारला.त्यामुळे आज हे पथक हात हलवत परत गेले आहे.
मात्र या संस्थेबाबत गेल्या चार दिवसात पडद्याआड मोठया घडामोडी घडल्या असल्याचे जाणवत होते.संस्थेबाबत धर्मदाय आयुक्त कार्यालयाने कारवाईची प्रक्रिया सुुरु केल्यानंतर इतके वर्षे निद्रीस्त असलेल्या निलंबीत ट्रस्टींना व विरोधी गटाच्या पंढरपूरातील काही मारवाडी बंधुंना जाग आली असल्याचे जाणवले.या संस्थेचा ताबा नव्या विश्वस्तांना सोपविण्यात अडथळा येवू नये याची काळजी घ्या असा एका बडया नेत्याचा फोन आल्यानंतर स्थानिक समाजसेवक एकत्र येवून नव्या विश्वस्तांंच्या ‘संरक्षणाची’ जबाबदारी पार पाडत होते तर निलंबीत विश्वस्तांनी याच हेतूने सोलापूरहून बराच फौजफाटा सोबत आणल्याचे दिसून आले.त्यामुळे रामबागेसारख्या या पवित्र ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंढरपूर शहरातील अशा अनेक संस्थांबाबत पंढरी वार्ता पाठपुरावा करीत असून भाविकांनी श्रध्देपोटी दिलेल्या देणग्यातून उभा राहीलेल्या या मंंदीर संस्थांमधील भ्रष्टाचारांचा पोलखोल केला जाणार आहे.