पंढरी वार्ता:- नगर परिषद संचलीत शाळांमधून गुणात्मक आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेणार-सभापती विवेक परदेशी लोकमान्य विद्यालयात तिळगूळ वाटपाच्या माध्यातून साधला विद्यार्थ्यांशी संवाद

पंढरपूर नगरपरिषद संचालित लोकमान्य विद्यालयात तिळगुळ समारंभ संपन्न झाला. समारंभ चे प्रमुख पाहुणे सीमाताई परिचारक व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते तिळगुळ वाटप समारंभ झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधनाताई भोसले होते.    सदर प्रसंगी संक्रांती भेट कार्ड प्रदर्शन चे उद्घाटन नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते झाले.
      सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे सिमाताई परिचारक यांनी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्ला व नुतन शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी यांना जी जबाबदारी दिली ती ते निच्छितच चांगल्या प्रकारे पार पाडतील व लोकमान्य विद्यालयाचे नावलौकिक करतील असे सांगितले .
   यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नगराध्यक्षा साधना भोसले म्हणाल्या की,लोकमान्य विद्यालय शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केलेली पंढरपुरातील जुनी शाळा आहे. या शाळेतील विध्यार्थीना सोय सुवीध पुरविल्या जाततील व विध्यार्थीच्या आवश्यकते नुसार जादा तास घेण्यात यावेत.व या स्पर्ध्देच्या युगात या शाळांमधील मुले आणखी सक्षमपणे आपला भविष्याकाळ उज्वल करण्यसाठी सज्ज झाली पाहीजेत.
  शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून पदभार स्विकारत विवेक परदेशी यांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे आपण कर्तव्यबुध्दीने व निष्ठेने पालन करु असे सांगत  नगर परिषद शिक्षण मंडळ संचलीत शाळांमधून गुणात्मक व दर्जेदार शिक्षण कसे उपलब्ध करुन दिले जाईल यासाठी आपण कटीबध्द राहणार असल्याचे सांगीतले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिक्षण शेत्रामध्ये खुप मोठे बदल होत आहेत परदेशातील विद्यापीठ आपल्या देशामध्ये येण्याच्या मार्गावर आहेत,गावोगावी नवीन शाळा ऊघडत आहेत त्या विद्यार्थ्यांना ङ्गि आकारून नवीन तंत्रज्ञान वापरून, नवनवीन योजना वापरत आहेत.या स्परधेच्चा युगात पंढरपुरातील व ईतर गावातील चांगल्ला शाळेत भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी,विद्यार्थ्यांच्या व्यक्तीत्मत्व विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या कल्लाणासाठी  वापरलेल्या चांगल्या पध्दतीचा, नियोजनाचा आभ्यास करून प्राथमिक व नगरपरिषद संचलीत शाळेत मध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
      या प्रसंगी बांधकाम समिती सभापती मालन देवमारे, पाणी पुरवठ समिती सभापती सुप्रिया सचिन डांगे,महिला व बालविकास समिती सभापती रेणुका धर्मराज घोडके, माजी उपनगराध्यक्षा सुजाता बडवे,भाग्यश्री शिंदे,रंजना पवार,नगरसेवक संजय निंबाळकर , ऋषिकेश उत्पात,नरसिंह सिंगन,नवनाथ रानगट, बसवेश्वर देवमारे, मिलींद मोरे, मुख्याध्यापक श्री. डिंगरे सर, पर्यवेक्षक आराध्ये सर , साखरे मॅडम व लोकमान्य विद्यालयाचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव