पंढरीवार्ता:- पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने सुनेत्राताई पवार यांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र प्रदेश महिला काग्रेसच्या सरचिटणीस व रुक्मिणी परिवाराच्या संस्थापिका सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर युवक कॉग्रेेसच्या वतीने येथील नवजिवन अपंग व मुकबधीर विद्यालयात मिठाई व फळे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन शहर युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने करण्यात आले होते.
             यावेळी बोलताना कॉग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक मामा फलटणकर म्हणाले की,सुुनेत्राताई पवार यांनी गेल्या दोन दशकापासून पंढरपूरच्या राजकारणात एक वेगळे वलय निर्माण केले आहे.विकासाभिमूख राजकारण करताना महिलांना संघटीत केल्यास विविध क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवू शकतात याचे अतिशय समर्पक उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.सहकार असो अथवा शिक्षण क्षेत्र अतिशय उत्तमरित्या त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाा आहे.सर्वसाामान्य कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यासोडविण्यासाठी तत्परतेने त्या कार्यरत असल्याचे दिसून येते.आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांच्या पुढील कारकिर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत.
             यावेळी प्रा.अशोक डोळ,शिवक्रांती संघटनेचे संस्थापक दत्तात्रय काळे,छावा संघटनेचे सतिश माने,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
      यावेळी कॉग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समिर कोळी,जिल्हा चिटणीस अमर सुर्यवंशी,युवक कॉग्रेेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे,शिवक्रांती संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण,राष्ट्रवादीचे भास्कर जगताप,निलेश कोरके,गणेश थिटे,गणेश भोसले,धर्मा भिसे,शंभुराजे धनवडे,दिपक गाडेकर,धनाजी आसबे,विशाल धोत्रे,राहुल चव्हाण,संतोष केदार,अयुब मुजावर,बाळासाहेब आसबे,विदयालयाचे प्रा.थोरात सर आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव