पंढरी वार्ता :- पंढरीच्या ‘वैकुंठ’ स्मशानभुमीचे रुपडे पालटणार ! वैशिष्ठयपुर्ण योजनेतून सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात
वैकुंठनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या पंढरीतील जन्ममृत्युच्या फेर्यातून सुटका झाल्यानंतर अखेरचा विसावा असलेल्या वैकुंठ स्मशानभुमीत सुधारणा व्हाव्यात अशी मागणी गेल्या काही वर्षापासून होत होती.यापुर्वी या स्मशानभुमीच्या कंपाऊंडचे काम करण्यात आले होते.मात्र स्मशानभुमी पर्यंत जाणारा रस्ता आतिल भागातील अर्तंगत रस्ते झाले पाहीजेत अशी मागणी केली जात होती.याची दखल घेत वैशिष्ठपुर्ण योजनेतून या स्मशानभुुमीत आता पेव्हींग ब्लॉक सह सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली असून त्याच बरोबर या स्मशानभुमीस जोडणार्या रस्त्याच्या कामासही सुरुवात करण्यात आली आहे.
या कामाची पाहणी नगरसेवक विक्रम शिरसट व नगरसेवक संजय निंबाळकर,अमोल डोके,बसवेश्वर देवमारे यांनी नुकतीच केली असून हे काम गतीने व दर्जेदार पध्दतीने झाले पाहीजेत अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.याबाबत अधिक माहीती देताना नगरसेवक विक्रम शिरसट म्हणाले की,स्मशानभुमीतील सुधारणा बाबत आ.प्रशांतराव परिचारक हे सातत्याने आग्रही होते.या ठिकाणी आवश्यक असलेल्या कामांचा अग्रक्रम निश्चित करुन तातडीने कामे हाती घेण्यात यावीत अशा सुचना त्यांनी दिल्या होत्या.त्यांच्या पाठपुराव्यानेच वैशिष्ठपुर्ण योजनेअर्तंगत हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.हे काम पुर्णत्वास आल्यानंतर या स्मशानभुमीचे रुपडे पालटणार असून येथे आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.