पंढरी वार्ता:-रस्ता रुंदीकरणाच्या कामात कुठल्याही मालमत्ताधारकांवर अन्याय होणार नाही याची मी हमी देतो-आ.प्रशांतराव परिचारक नगरसेवक गुरुराज अभ्यंकर,राजकुमार शहापूरकर, नगरसेवक विक्रम शिरसट यांची मार्गदर्शन समिती स्थापन !

भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात असताना बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांवर कुठलाही अन्याय होणार नाही.त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी आपण ठोस प्रयत्न करणार असून रेडीरेकनरचे दर,मालमत्तांचे मुल्यांकन यावर आधारीत नुकसान भरपाईच्या नोटीसा सद्या 127 मिळकतदारांना देण्यात आलेल्या आहेत.नागपूर सुधारणा न्यास तसेच विविध तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे विशेष निकष लावून नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे त्याच पध्दतीने या बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी आपण ठोस प्रयत्न करणार असून याबाबत कुठलाही अन्याय होणार नाही याची मी हमी देतो अशी ग्वाही बाधीत मालमत्ताधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली आहे.
      यावेळी बोलताना आ.प्रशांतराव परिचारक यांनी बाधीत होणारे मालमत्ता धारक व त्यांना मिळनारी नुकसान भरपाई याची माहीती देवून पंढरपूर शहरात रेडीरेकनरचे विविध झोन आहेत.त्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम बदलते.भजनदास चौकातील मिळकतीचा रेडीरेकनर आणि लगतच्या कुंभारगल्लीतील मालमत्तांचा रेडीरेकनर यात फरक आहे.तसेच बांधकामाचा प्रकार यात बदल होत असल्याने नुकसान भरपाईबाबत वेगळे निकष लावले गेले आहेत.मात्र तरीही आपण विशेष बाबत म्हणून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करु असे त्यांनी सांगीतले.बाधीत मालमत्ता धारकांना योग्य ते मार्गदर्शन व तक्रारी करण्यासाठी नगरसेवक गुरुराज अभ्यंकर,विक्रम शिरसट व राजाभाऊ शहापूरकर यांनी जबाबदारी पार पाडावी अशा सुचना यावेळी त्यांनी केल्या.
     या बैठकीत बोलताना मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी अर्बन बँक ते सोलापूर रस्ता या रस्त्याच्या रुंदीकरणात बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना रेडीरेकनरच्या चौपट नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला.जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत जागा ताब्यात दिली जाणार नाही अशी भूमिका घेतली तेव्हा या मालमत्ता धारकांना चौपट नुकसान भरपाई देण्यात आल्यानंतरच हे काम सुरु करण्यात आले.भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याच्या कामात बाधीत होणार्‍या कुुटूंबाना याच पध्दतीने नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय जागा रिकाम्या केल्या जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.
       यावेळी बोलताना राजाभाऊ शहापूरकर म्हणाले की, रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात उशीर झाला असल्याचे सांगत ज्या कुुटंबाची 75 टक्के पेक्षा जास्त जागा रुंदीरकणात जाणार आहे त्यांना मिळणार्‍या त्यांना नुकसान भरपाई पोटी मिळणार्‍या रुकमेत शहरापासून दूर अंतरावरही प्लॉट मिळू शकत नाही त्यामुळे त्यांचे पर्यायी जागा देवून पुनर्वसन करा अशी मागणी केली.
     यावेळी बोलताना नगरसेवक अनिल अभंगराव म्हणाले की,अर्बन बँक ते सोलापूर रस्ता या रस्त्याच्या कामात नागरिकांची मागणी लक्षात घेवून नगर पालीकेच्या वैशिष्ठयपुर्ण योजनेतील निधी खर्च करुन जास्तीची नुकसान भरपाई देण्यात आली.त्याप्रमाणेच  या रस्त्याच्या कामात बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली.
   यावेळी नगरसेवक मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक सचिन डांगे,नगरसेवक विवेक परदेशी,बाबु शहा,ह.भ.प.भागवत महाराज चवरे,महेश खिस्ते,म्हंतप्पा हत्ते आदींसह या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव