पंढरी वार्ता:- राष्ट्रवादी कॉग्रेेसच्या वतीने पंढरीत संविधान बचाव कॅन्डल मार्च ! विविध पक्ष संघटनांचा सहभाग !

देशात समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित व्हावी, सर्वांना समान अधिकार मिळावा, यासाठी आपले संविधान महत्वाची भूमिका बजावते. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या या संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न काही अनिष्ट प्रवृत्तीचे लोक करत आहेत. या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉगेेेस पक्षाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.दिपक साळुंखे-पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांच्या आदेशानुसार पंढरीतही संविधान बचाव कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते अशी माहीती राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी दिली आहे.
      येथील छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या संविधान बचाव कॅन्डल मार्चची सुरुवात करण्यात आली तर विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या कॅन्डल मार्चची समाप्ती करण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या मार्चमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.दिपक पवार,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष दिपक वाडदेकर,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,सलीम मुलाणी,जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव,राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस हेमलता पांढरमीसे,शहराध्यक्ष रंजना हजारे,तालुकाध्यक्ष अनिता पवार,राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या शहराध्यक्षा चारुशीला कुलकर्णी,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर उपाध्यक्ष रहीम शेख,गिरीष चाकोते,सचिन कदम,शहर सचिव विजय काळे,शहर संघटक महंमद मुलाणी,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरज पेंडाल,युवक जिल्हा सरचिणीस प्रशांत घोडके,युवक कॉग्रेस (आय)चे अध्यक्ष शंकर सुरवसे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,शहराध्यक्ष रशीद शेख,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भोसले,तालुकाध्यक्ष सुभाष बागल,किसान सभेचे तालुकाध्यक्ष कृष्णा माळी,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अभिजीत साळुंखे,शरद कला व क्रिडा प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर खजिनदार विठ्ठल आटकळे,संघटक महंमद मुलाणी,अजित तांबोळी,युवराज भोसले,विशाल भोसले यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव