पंढरी वार्ता:- भाळवणी येथे अवैध दारु धंद्याविरोधात सुरु असलेल्या उपोषणाकर्त्यांची ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी यांनी घेतली भेट ! वरिष्ठांशी संपर्क करुन केली अवैध धंदे बंद करण्याची मागणी !

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील मारूती मंदिरामध्ये येथील रहिवाशी गोरख गणपत लिंगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत परंतू गेल्या तीन दिवसापासून या उपोषणाची कुणीही दखल घेतली नव्हती.मात्र आज ह.भ.प.बंडातात्या कराडकर व आ.गणपतराव देशमुख यांनी उपोषण स्थळास भेट देवून उपोषणकर्त्यांच्या भावना समाजवून घेतल्या.यावेळी ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी उपोषणकर्त्यांच्या भावना जाणून घेत थेट राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील,प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क शाधला व या उपोषणाची तातडीने दखल घेत कारवाई झाली पाहीजे अशी मागणी केली.आजही हे उपोषण सुरुच याबाबत ठोस कारवाईचे आश्‍वासन मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
  भाळवणी व परिसरात सुरू असलेले अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत.तसेच गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यांसाठी कायमस्वरूपी औटपोस्ट व्हावे.अवैध धंदे करणारे गावात  दहशत निर्माण करीत असून त्यास आळा घालावा व अशा अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाई करावी.अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबधीत पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करावी. दारूबंदीसाठी लढणार्‍या ग्रामस्थांना व महिलांना सुरक्षा पुरवावी.व दारूबंदीसाठी लढणार्‍या गावकजयांवर खोट्या केसेस दाखल करू नयेत आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुर आहे.या बाबतचे  निवेदनही उपोषणकर्त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक खराडे यांना निवेदन दिले होते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या भाळवणी गावात शाकंबरी देवीचे व अष्टभुजा देवीचे पुरातन मंदिर असून गावातील वातावरण सांप्रदायिक आहे.मात्र गावातील अवैध दारुधंद्यांमुळे ग्रामस्थांना तळीरामांकडून नाहक त्रास होत असतो.या उपोषणासाठी भाळवणीच्या सरपंच सौ. पुनम गवळी, सांगोल्याच्या नगराध्यक्षा राणी माळी, भाळवणी येथील महात्मा ङ्गुले युवक संघटना तसेच गावातील महात्मा ङ्गुले गणेशोत्सव तरूण मंडळ,नाभिक युवक संघटना, सांगोला येथील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजी ङ्गाटे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब वाळके, सांगोल्याचे नगरसेवक आनंदा माने इत्यादी मान्यवरांनी यास पाठिंबा दिला असून प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडण्यात येणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव