पंढरी वार्ता:- संविधान बचाव कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होण्याचे राष्ट्रवादी कॉग्रेेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचे आवाहन

अच्छे दिनाचे अमिष दाखवत राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या काळात राज्यातील अनुसुचीत जाती-जमाती तसेच नवबौध्द यांच्यावर मोठया प्रमाणात अत्याचार अन्यायाच्या घटना घडल्या आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण जगात आदर्श ठरेल अशी राज्यघटना या देशास बहाल केली आहे.मात्र भाजपाचे केंद्रातील अनेक मंत्री घटना बदलायची भाषा करीत आहेत.तर अनेक पदाधिकारी घटना दुरुस्ती करुन मागासवर्गीय व शोषीत घटकांचे हक्क नाकारण्याचे षडयंत्र रचले जात आहे.त्यामुळेच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता पंढरीत संवीधान बचाव कॅन्डल मार्चचे आयोजन केले असून यामध्ये सर्व समविचारी पक्ष संघटना व व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी केले आहे.
                        मुंबई येथेही या संवीधान बचाव कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार असून त्याच बरोबर विविध सामाजिक संघटना,समविचारी पक्षही सहभागी होणार आहेत.पंढरपूरात 26 जानेवारी रोजी येथील छत्रपती शिवाजी चौक येथून सायंकाळी ठिक 6 वाजता या संविधान बचाव कॅन्डल मार्चची सुरुवात होणार आहे व विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कॅन्डल मार्चचे विसर्जन होणार आहे.तरी यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव