पंढरी वार्ता:- किराणा दुकानातून तंबाखू विक्रीस प्रतिबंध करण्याचे आव्हान पंढरपूरचे अन्न निरिक्षक पेलणार ?
किराणा तसेच अन्य दुकानांतून तंबाखू व तंबाख पदार्थांच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. ज्या दुकानातून ग्राहकोपयोगी वस्तू (एङ्गएमसीजी) विक्री होते अशा दुकानात आता विक्रीसाठी तंबाखू ठेवता येणार नसल्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषधी विभागाने बुधवारी दिले आहेत.लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पंढरपूर शहरात जवळपास शेकडोंच्या संख्येत छोटी मोठी किराणा व विविध नित्योपयोगी वस्तू विक्रींची दुकाने असून या ठिकाणी तंबाखूची विक्री करण्यास प्रतिबंधक करण्याची व योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी नगर पालीकेकडून अन्न विभागाकडे प्रतिनियुक्तीवर गेलेल्या विनायक शेटे यांच्यावर आहे.मात्र त्यांच्या कार्यपध्दतीबाबत पंढरपूरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून तक्रारी आल्यास कारवाई करण्याऐवजी‘समजूत’काढण्याकडेच त्यांचा जास्त कल असल्याचे दिसून येते.त्यामुळे पंढरपूरात गुटखा विक्री अजूनही पुर्णत: बंद होऊ शकली नाही.आता तंबाखू बंदीची जबाबदारीही संपुर्ण शहरासाठी एकमेव निरीक्षक असलेले विनायक शेटे हे पेलणार का ? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्याच बरोबर शाळा, महाविद्यालयांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखामुक्त करण्याची जबाबदाही अन्न विभागाची आहे.मात्र पंढरपूर शहरात अनेक शाळा महाविद्यालया लगत अथवा समोरच तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची दुकाने आहेत.या विरोधात कारवाई करण्यासाठी विनायक शेटे यांच्याकडून धाडशी कारवाई अपेक्षीत आहे.कर्करोग दिनाच्या निमित्ताने 6 फेब्रुवारीपासून विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी पंढरपूर शहरात होणे अपेक्षीत आहे.
किराणा दुकानातून चॉकलेट व चिप्स खरेदीसाठी गेलेली लहान मुले तेथे विक्रीस असलेल्या तंबाखूमुळे प्रभावित होतात. हे टाळण्यासाठी आता अशा दुकानांतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्यासंबंधीचे शासकीय परिपत्रक 9 जानेवारीला काढण्यात आले आहे. ज्या दुकानांतून ग्राहकोपयोगी नित्याच्या वस्तू, पदार्थ यांची विक्री होते अशा दुकानांत तंबाखू विक्रीसाठी ठेवल्यास किशोरवयीन मुले त्याकडे आकर्षित होतात. त्यांना तंबाखूचे व्यसन लागण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.