पंढरी वार्ता:- भजनदास चौक ते सोलापूर रस्ता रुंदीकरणात बाधीत मिळकतदारांवर अन्याय कशासाठी ? नुकसान भरपाईत दुजाभाव होत असल्याने बाधीत मिळकतदारांकडून संताप व्यक्त
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या असून या रस्त्यावरील बाधीत होणार्या मालमत्ता धारकांना आपल्या मालकी हक्काचे पुरावे सादर करा व नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे आपली नुकसान भरपाई प्राप्त करण्यासाठी कागदपत्रे द्या अशा आशयाच्या पंधरा दिवस मुदतीच्या नोटीसा पंढरपूर प्रांत कार्यालयाकडून बजावण्यात आलेल्या आहेत.मात्र या नोटीसांवर 22 डिसेंबर 2017 ही तारीख असून प्रत्यक्षात 15 दिवस हरकतीची मुदत उलटून गेल्यानंतर दिनांक 17 जानेवारी 2018 रोजी या नोटीसी मिळकतदारांच्या हातात पडल्या आहेत.या बाबत तातडीने विचार विनिमय करण्यासाठी येथील नंद यशोदा मंदीर येथे बाधीत मिळकतदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत राजकुमार शहापूरकर यांनी बाधीत मिळकतदारांना मार्गदर्शन करुन अर्बन बँक ते सोलापूर रस्ता या रस्तारुंदीकरणाच्या कामात नुकसान भरपाई देताना जे निकष लावले गेले व नुकसान भरपाई देण्यात आली त्याच प्रमाणे या रस्ता रुंदीकरणात बाधीत होणार्या कुुटंबाना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.व यासाठी प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे सांगीतले.यास उपस्थितांनी एकमुखाने आपला पाठींबा व्यक्त केला आहे.
भजनदास चौक ते सोलापूर रस्ता हा 12 मिटर रुंद केला जाणार आहे.पंढरपूर शहरात प्रवेश करण्याचा महत्वपुर्ण मार्ग म्हणून या रस्त्याचे रुंदीकरण 1967 साली प्रस्तावीत करण्यात आले.तेव्हा पासून येथील मिळकतदारांच्या डोक्यावर या रस्ता रुंदीकरणाची टांगती तलवार होती.त्यामुळे गेल्या पन्नास वर्षापासून या रस्त्यावर बाधीत होणार्या मिळकतदारांना आहे याच वास्तूत बदल करण्यास अथवा बांधकाम करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.एकदा रस्ता रुंदीकरणाचे काम पुर्ण झाले की मग बांधकाम करता येईल असा विचार करीत येथील एक पिढी म्हातारी झाली परंंतू यंदा होणार म्हणत म्हणत या रस्त्याचे रुंदीकरण 40 वर्षे रखडले गेले.1967 च्या आराखडायानुसार हा रस्ता 9 मिटर रुंद करण्याचे प्रस्तावीत होते.त्यामुळे अनेक मालमत्ता धारकांना तेवढे अंतर सोडून नव्याने इमारती बांधल्या परंतू 2006 च्या विकास आरखडयात हा रस्ता थेट 15 मिटर रुंद करण्याचे प्रस्तावीत करण्यात आल्याने नव्याने बांधकाम केलेल्या अनेक मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले होते.त्यावेळी संघटीत विरोध प्रचंड प्रमाणात झाल्याने व हरकती आल्याने या रस्त्याचे रुंदीकरण 15 मिटरवरुन 12 मिटर करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या भागातील बाधीत मिळकतदारांचा विरोध काहीसा मावळला होता.
मात्र आता हरकतीची मुदत संपूण गेल्यानंतर बाधीत मिळकतदारांच्या हातात रस्ता रुंदीकरणाच्या नोटीसा पडल्या आहेत.आम्ही स्वखुशीने आमच्या अतिशय मोक्याच्या व किमती जागा रस्ता रुंदीकरणासाठी देत असताना अर्बन बँक ते सोलापूर रस्ता या रस्त्यावरील मिळकतदारांना ज्या निकषावर व ज्या दराने नुकसान भरपाई देण्यात आली त्याच दराने आम्हास नुकसान भरपाई मिळाली पाहीजे अशी भावना उपस्थित बाधीत होणार्या मिळकतदारांनी व्यक्त केली.
या बैठकीस नंद यशोदा मंदीर संस्थेचे विश्वस्त दगडू नायकू,वासुदेव खिस्ते,संंजय ढाळे,म्हतंप्पा हत्ते, संजय हेंद्रे,रुपचंद शहा,दत्तात्रय पाठक,गंगाराम पंगुडवाले,हरी दहीहंडे,चंद्रकांत नायकू,गणेश लोढे,उत्तम आदमीले,राहूल पुणेकर,सोमनाथ हुच्चे,नाना भागानगरे,आदम आतार,किरण शहा,ह.भ.प.चवरे महाराज यांच्यासह या रस्ता रुंदीकरणात बाधीत होणारे सर्व मालमत्ताधारक उपस्थित होते.
भजनदास चौक ते सोलापूर रस्ता हा 12 मिटर रुंद केला जाणार आहे.पंढरपूर शहरात प्रवेश करण्याचा महत्वपुर्ण मार्ग म्हणून या रस्त्याचे रुंदीकरण 1967 साली प्रस्तावीत करण्यात आले.तेव्हा पासून येथील मिळकतदारांच्या डोक्यावर या रस्ता रुंदीकरणाची टांगती तलवार होती.त्यामुळे गेल्या पन्नास वर्षापासून या रस्त्यावर बाधीत होणार्या मिळकतदारांना आहे याच वास्तूत बदल करण्यास अथवा बांधकाम करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.एकदा रस्ता रुंदीकरणाचे काम पुर्ण झाले की मग बांधकाम करता येईल असा विचार करीत येथील एक पिढी म्हातारी झाली परंंतू यंदा होणार म्हणत म्हणत या रस्त्याचे रुंदीकरण 40 वर्षे रखडले गेले.1967 च्या आराखडायानुसार हा रस्ता 9 मिटर रुंद करण्याचे प्रस्तावीत होते.त्यामुळे अनेक मालमत्ता धारकांना तेवढे अंतर सोडून नव्याने इमारती बांधल्या परंतू 2006 च्या विकास आरखडयात हा रस्ता थेट 15 मिटर रुंद करण्याचे प्रस्तावीत करण्यात आल्याने नव्याने बांधकाम केलेल्या अनेक मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले होते.त्यावेळी संघटीत विरोध प्रचंड प्रमाणात झाल्याने व हरकती आल्याने या रस्त्याचे रुंदीकरण 15 मिटरवरुन 12 मिटर करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या भागातील बाधीत मिळकतदारांचा विरोध काहीसा मावळला होता.मात्र आता हरकतीची मुदत संपूण गेल्यानंतर बाधीत मिळकतदारांच्या हातात रस्ता रुंदीकरणाच्या नोटीसा पडल्या आहेत.आम्ही स्वखुशीने आमच्या अतिशय मोक्याच्या व किमती जागा रस्ता रुंदीकरणासाठी देत असताना अर्बन बँक ते सोलापूर रस्ता या रस्त्यावरील मिळकतदारांना ज्या निकषावर व ज्या दराने नुकसान भरपाई देण्यात आली त्याच दराने आम्हास नुकसान भरपाई मिळाली पाहीजे अशी भावना उपस्थित बाधीत होणार्या मिळकतदारांनी व्यक्त केली.
या बैठकीस नंद यशोदा मंदीर संस्थेचे विश्वस्त दगडू नायकू,वासुदेव खिस्ते,संंजय ढाळे,म्हतंप्पा हत्ते, संजय हेंद्रे,रुपचंद शहा,दत्तात्रय पाठक,गंगाराम पंगुडवाले,हरी दहीहंडे,चंद्रकांत नायकू,गणेश लोढे,उत्तम आदमीले,राहूल पुणेकर,सोमनाथ हुच्चे,नाना भागानगरे,आदम आतार,किरण शहा,ह.भ.प.चवरे महाराज यांच्यासह या रस्ता रुंदीकरणात बाधीत होणारे सर्व मालमत्ताधारक उपस्थित होते.
