पंढरी वार्ता:- सुर्यनारायण देव यात्रेची नारायण चिंचोलीत उत्साहात सांगता ! प्रणव परिचारक यांच्याहस्ते रथसप्तमी निमित्त महापूजा

सुर्यनारायण देव यात्रेनिमित्त गेले महिनाभर नारायण चिचोंली येथे सुुरु असलेला यात्रा महोत्सवाची बुधवारी रथसप्तमीनिमित्त युवा नेते प्रणव परिचारक यांच्याहस्ते महापूजा करुन सांगता करण्यात आली आहे.गेले संपुर्ण महिनाभर प्रत्येक रविवारी नारायण चिंचोली येथील पुरातन हेमाडपंथी सुर्यनारायण मंदीरास हजारोंच्या संख्येने भाविकांनी भेट दिली असून विविध मान्यवरांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न झाली आहे.रथसप्तमीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सुर्यनारायणाच्या मुर्तीच्या मुखमंडलावर पडणारी सुर्याची पहीली किरणे आपल्या नेत्रात साठविण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
      यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती लक्ष्मण धनवडे,सरपंच विठ्ठल माने,उपसरपंच बळवंत धनवडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड,ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय कोळेकर,चेअरमन धर्मराज नलवडे,व्हा.चेअरमन विष्णू माने,तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष अभिजीत कवडे,वसंत कोले,भास्कर गुंड,शिवजी वसेकर,भाऊसाहेब माने,दत्तात्रय कोळेकर,सुनिल माने,भानुदास गाजरे,नितिन गुंड,संदीप हिंगमीरे,साधू नलवडे,चिटबॉय गोडगे आदी उपस्थित होते.यावेळी ट्रस्टच्या वतीने प्रणव परिचारक यांचा सत्कार शिवाजी गुंड यांच्या हस्ते करण्यात आला.    

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव