पंढरी वार्ता:- दिलित मित्र कै.नारायणराव धोत्रे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन !

पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दिलितमित्र कै.नारायणराव धोत्रे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दिनांक 22 रोजी पंढरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी ठिक 11 वाजता ‘पालवी’ येथे मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते व जि.प.सदस्य वसंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमात येथील बालकांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास डॉ.बजरंग धोत्रे,डॉ.राजेश फडे,नगरसेवक नवनाथ रानगट,संग्राम अभ्यंकर,गुरुनाथ अभ्यंकर, विवेक परदेशी,नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके,समाजसेवक धर्मराज

घोडके,युवक नेते दत्तात्रय धोत्रे,प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     सकाळी ठिक 11.30 वाजता निवासी मुकबधीर विद्यालय पंढरपूर येथे नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते व मा.उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सदस्या नगरसेविका भाग्यश्री सचिन शिंदे व मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
    सकाळी 12 वाजता नवजिवन निवासी अपंग शाळा बायपास रोड येथे मा.नगराध्यक्ष सतिश मुळे यांच्या शुभहस्ते तर मा.नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास नगरसेवक अनिल अभंगराव,मा.नगरसेवक सत्यविजय मोहोळकर,समाजसेवक महादेव धोत्रे,अंकुश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.
   दुपारी ठिक 12.15 वाजता शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळा येथे मा.नगराध्यक्ष पांडुरंग घंटी यांच्या शुभहस्ते व मा.नगरसेवक सचिन डांगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक ॠषीकेश उत्पात,विक्रम शिरसट,प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य विकास टाकणे आदी उपस्थित राहणार आहेत.
 दुपारी ठिक 12.30 वाजता आरोग्य वैभव मंदीर संचलीत रामकृष्णहरी वृध्दाश्रम संतपेठ येथे मा.नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे यांच्या शुभहस्ते व मा.उपनगराध्यक्ष इब्राहीम बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमात वृध्दांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास नगरसेवक राजू सर्वगोड,संजय निंबाळकर,बजरंग देवमारे,अमोल डोके,पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे,रामभाऊ माळी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
     हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवरत्न तरुण मंडळ ज्ञानेश्‍वर नगर,आदीशक्ती तरुण मंडळ ज्ञानेश्‍वर नगर,रामजाने तरुण मंडळ डवरी गल्ली,न्यू वडार समाज गणेशोत्सव तरुण मंडळ,न्यू वडार समाज नवरात्र महोत्सव तरुण मंडळ,गजानन महाराज भक्त मंडळ आदींसह विविध मंडळांचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव