पंढरी वार्ता :-तीर्थक्षेत्र देहुत दारू-मांस विक्रीस बंदी ! देहू ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय !
तीर्थक्षेत्र देहु परिसरात मांस व दारू विक्रीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र देहु परिसरात असलेली अवैध दारू व मांस विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानची बुधवारी दुपारी ग्रा. पं. कार्यालयात बैठक झाली.मांस विक्रेत्यांकडे असलेला साठा संपवण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे.
पंढरपूर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणीही दारुबंदी व्हावी अशी मागणी सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे मा.अध्यक्ष वै.ह.भ.प.विवेकानंद महाराज वासकर यांनी केली होती.त्यावेळी सत्तेत असलेल्या युती शासनाने याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही महाराज मंडळींना दिले होते.मात्र याबाबत आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही.महसुलमंत्री पदाचा पदभार एकनाथ खडसे यांच्याकडे असताना त्यांनी पंढरपूर नगर पालीकेने ठराव केल्यास आम्ही पंढरीत दारुबंदी करण्याचा निर्णय घेवू असे आश्वासन दिले होते.मात्र ते मंत्रीपदावरुन पायउतार झाले आणि त्यांचे आश्वासनही हवेत विरले.सुप्रिम कोर्टाने महामार्गवरील दारु विक्रीस प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील अनेक बार व परमिटरुम बंद झाले होते.मात्र पुढे यात बर्याच घडामोडी घडल्या आणि बंद झालेले दारु दुकाने पुन्हा सुरु झाली आहेत.
गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरात उघडयावर व सार्वजनिक ठिकाणी मासाहारी पदार्थ विक्रीचे व्यवसायीक मोठया प्रमाणात वाढले असून या ठिकाणी उघडयावरच बसून दारु पिणार्यांची संख्याही प्रचंड आहे.त्यामुळे येथे येणारे भाविक प्रचंड नाराजी व्यक्तकरताना दिसून येतात. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत दारु बंदी झाली पाहीजे यासाठी तेथील ग्रामस्थांनी एकजुटीने दारुबंदीचा निर्णय घेतला आहे.पंढरपूरातही दारुबंदी व्हावी यासाठी येथील संतमंडळी व सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतल्यास पंढरपूर शहरही दारुमुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अवैध दारु विक्रेत्यांसाठी ‘ड्राय डे’ठरला गुड फ्राय डे ! उत्पादन शुल्क विभागाची परिपत्रकापुरतीच जबाबदारी ?26 जानेवारी रोजी ड्राय डे असल्याने पंढरपूर व तालुक्यात अवैध दारु विक्री करणार्यांसाठी मात्र हा दिवस गुड फ्रायडेच ठरला आहे.वास्तविक विविध बार परटिमरुम या ठिकाणी कारवाई करण्याचे पोलीसांचे अधिकार उत्पादन शुल्क विभागाच्या दबावामुळे यापुर्वीच काढून घेतले गेले आहेत.एवढेच काय तर दारु विक्रीसाठीच्या सीएफएल -3 लायसेन्सचे नुतणीकरण करताना प्रतिवर्षी स्थानिक पोलीस ठाण्याचा ना हरकत दाखला घेण्याची अटही शिथील करुन पोलीस खात्यास कारवाईपासून दूर लोटण्याचा जनू विडाच उत्पादन शुल्क विभागाने उचलला आहे.मात्र अवैध दारुविक्रीच्या विरोधातील कारवाईच्या बाबतीत पोलीस खातेच अग्रेसर असल्याचेे नेहमीच दिसून येते.काल शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ड्राय डे असताना शहरात अनेक ठिकाणी चोरुन दारु विक्री केली जात आहे अशी चर्चा होती.मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याबाबत कारवाई करण्यासाठी कायम उदासीन असतात त्याचा प्रत्यय कालही आला.निदान ड्राय डे च्या दिवशीतरी पंढरीत दारुबंदी व्हावी यासाठी उत्पादन शुल्क विभागाने ठोस कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
