पंढरी वार्ता:- सदभावना सेवाभावी संस्थेच्या वतीने इसबावी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथील सदभावना सेवाभावी संस्थेच्या वतीने इसबावी विसावा कट्टा  येथे शालेय विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू शिदे यांच्या हस्ते नाथपंथी डवरी समाजाचे शहराध्यक्ष सतिश सातपुते यांच्याहस्ते खाऊ वाटप करण्यात आले.समता,स्वातंत्र्य आणि बंधुता यांची अनमोल देणगी आजच्याच दिवशी या देशाला मिंळाली आहे.आणि त्याचा हा उत्सव या लहान लहान बालकांसोबत साजरा करताना मोठया आनंदाची अनुभूती येत असल्याचे प्रतिपादन राजू शिंदे यांनी केले.
       सदभावना सेवाभावी संस्थेच्या माध्यामतून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यामध्ये रक्तदान शिबीर,वृध्द नागरिकांची आरोग्य तपासणी,शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य वाटप केले जाते.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आजचा हा उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी स्वप्नील शिंदे,सोनू शिंदे,योगेश लोखंडे,विजय जगताप,सागर अपुणे,अदित्य संगीतराव,सचिन ढोले,स्वप्निल जाधव,सचिन ढोले,अजित गायकवाड,पापल्या कथले,नंदू पाटील,आण्णा पोरे,विजय राऊत,ओंकार शिंदे,ओंकार साळुंखे,आकाश रिकीनी,अक्षय संगीतराव,शिवम बाबर,ओंकार विभूते,धिरज माळी,तुषार माळी,सुरज जाधव,विजय मेटकरी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव