पंढरी वार्ता:- नगर पालीकेने वारंवार पत्र व्यवहार करुनही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सुस्तच ! महावीर नगर येथील पाण्याच्या टाकीचे पाणी मुरतेय कुठं ?
तिर्थक्षेत्र विकास आरखडयाअर्तंगत पंढरपूर शहरात सर्वत्र समान दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या हेतूने विस्तारीत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली.या योजने अर्तंगत शहरातील अनेक उपनगरात तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नव्याने पाणी पाण्याच्या वितरण टाक्या उभारण्यास मंजूरी देण्यात आली व तातडीने या कामांसाठी निधीही उपलब्ध करण्यात आला. या अंर्तगत पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी नव्याने पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या व तेथून पाणी पुरवठाही होऊ लागला मात्र 2009 सालची मंजूरी असलेली व 2012 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली महावीर नगर येथील पाण्याची टाकी ही कायम वादाच्या भोवर्यात अडकलेलीच दिसून आली आहे.या टाकीचे काम ज्या गतीने झाले व रखडले त्याबाबत या परिसरातील नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यहक्त होत होती.या परिसरातील नागरिकांना योग्य दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी उभारण्याचे प्रस्तावीत करण्यात आले होते.ही टाकी उभारण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले आणि इथेच घोळ झाला. या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे अशा आशयाची तक्रार गेली 2 वर्षे नगर पालीका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे करीत आहे.या टाकीची चाचणी घेण्यात आली तेव्हा या टाकीस मोठया प्रमाणात गळती असल्याचे दिसून आले.पंढरपूर नगर पालीकेने पाच ते सहा वेळा पत्रव्यवहार केला मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सुस्त अधिकारी काही याची दखल घेईनात ! त्यामुळे पन्नास लाख रुपये खर्च करुनही महावीर नगर येथील ही पाण्याची टाकी आजतागायत नगर पालीकेच्या उपयोगात येवू शकली नाही.
पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पंढरपूर शहरातील विकास कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.त्या चौकशी पथकाकडून या टाकीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची व पाणी पुरवठा सारख्या महत्वाच्या विषयात हलगर्जीपणा करणार्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबधीत अधिकार्यांचीही चौकशी होणे गरजचे आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता श्री मासाळ यांना याबाबत विचारणा करण्यासाठी वारंवार फोन लावला मात्र ते कार्यालयात उपस्थित नसतात व मोबाईल नंबर अनेकवेळा बंद असतो.हे काम निकृष्ट पध्दतीने झाले आहे अशी तक्रार दस्तूरखुद्द नगर पालीकेची असताना देखील याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुग गिळून का गप्प बसले आहे असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.