पंढरी वार्ता:- नगरपालीका,ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या वादात लिंगायत स्मशानभुमीची भिंत बेवारस !
पंढरीतील वैकुंठ स्मशानभुमीच्या सुशोभीकरणाचे काम एकीकडे प्रगतीपथावर असतानाच लिंगायत समाजाच्या दफनभुमीची दुरावस्था मात्र कायम असून गोपाळपूर ते भक्त निवास या रस्त्याच्या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई केली जात असताना एक वर्षापुर्वी लिंगायत स्मशानभुमीची कंपाऊंड भींत पडली होती.त्यामुळे या स्मशानभूमीत भटकया कुत्र्यांचा,मोकाट जनावरांचा मोठया प्रमाणात वावर आहे.त्यामुळे संबधीत ठेकेदारावर कारवाई करुन तातडीने संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी समाजसेवक धर्मराज घोडके यांनी केली आहे.
याबाबत सा.पंढरी वार्ताशी बोलताना धर्मराज घोडके म्हणाले की,लिंगायत स्मशानभुमीस संरक्षक भींत नसल्याने मोठया प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.त्यामुळे येथे दफन केलेल्या मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी खड्डे पडत असल्याचे पहावयास मिळते.येथील रस्त्याचे काम करीत असताना ही संरक्षक भीत पडल्यानंतर सदर कामाच्या ठेकेदाराने भींत पुन्हा बांधून देणे अपेक्षीत होते.याबाबत लिंगायत समाजातील विविध संघटनांनीही मागणी केली होती.मात्र सदर ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने पंढरपूर नगर पालीकेच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे.
लिंगायत स्मशानभूूमीची संरक्षक भींत पाडण्यात आल्यानंतर लिंगायत समाजातील विविध संघटनांनी वारंवार याबाबत नगर पालीका व बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला आहे.या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात असून या रस्त्याच्या बाजुने टाकण्यात येणार्या पाईपलाईन टाकताना या लिंगायत स्मशानभुमीची संरक्षक भिंत अगदी लगत असल्याने पडली आहे.याबाबत नगर पालीकेने सार्वजनिक बांधकाम विभागास पत्रही दिलेले होते.मात्र या कामासाठी ठेकेदारास घातलेल्या अटीनुसार पाईपलाईनचे काम करताना ही भिंत पाडावीच लागणार होती अशा आशयाचे उत्तर पत्राद्वारे बांधकाम विभागाकडून नगर पालीकेस देण्यात आले आहे.त्यामुळे नगर पालीका व सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या वादात पंढरपूरातील लिंगायत स्मशानभूमीस संरक्षण देणारी ही भिंत पडल्याने ही स्मशानभुमी बेवारस झाली असल्याचे दिसून येते.