पंढरी वार्ता:- पंढरीत आज आणखी एका जुगार अड्डयावर धाड! जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकाची शहरातील दुसरी मोठी कारवाई. 2 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त
आमच्या हद्दीत कुणीही कारवाई करु शकत नाही या मस्तीत पंढरपूर रेल्वे स्थानकातील पोलीस चौकतीतच चालविला जात असलेल्या जुगार अड्डयावर कालच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने मोठी कारवाई करुन 20 जणांना ताब्यात घेण्याबरोबरच गेल्या कित्येक वर्षापासून उघडपणे चालविला जात असलेला येथील जुगार अड्डा उध्दवस केलेले होता.कालच्या या कारवाई नंतर या विशेष पथकाचे सर्वत्र अभिनंदन केले जात असतानाच आज पुन्हा एका विशेष पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी साडेचारच्या येथील आणखी एका जुगार अड्डयावर धाड टाकून या जुगार अड्डयाच्या तीन चालकांसह 13 जणांना ताब्यात घेवून 2 लाख 58 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,येथील गोविंदपुरा भागात एका खोलीत (1) विशाल अशोक करकंबकर, रा. कोळी गल्ली, पंढरपूर (2) विठ्ठल करकंबकर (3) समाधान चंद्रकांत शिंदे, दोघे रा. गोविंदपुरा, पंढरपूर हे चालवत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकून (1)विशाल अशोक करकंबकर वय 24 (2)दत्ता नामदेव धोत्रे वय 29 (3) दादा गंगाराम औसेकर वय 42 (4) अशोक किसन शिरसाठ वय 55 (5) योगेश बाबू परमार वय 26 (6) अनिल शेट्टी पवार वय 42 (7)परमेश्वर मोहन घंटे वय 30 (8) सुनिल सुभाष डोईङ्गोडे वय 30 (9) महेश उद्धव आगावने वय 29 (10) सचिन तुकाराम अधटराव वय 38 वरील सर्व रा. पंढरपूर शहर या आरोपींना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना पकडून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 02,58,980/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील सर्व आरोपी यांचेविरूद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष पथकातील पो.उपनिरिक्षक जी एच निंबाळकर , पो हे कॉ मनोहर माने, पो.कॉ. अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, गणेश शिंदे, श्रीकांत बुरजे, श्रीकांत जवळगी, सिध्दाराम स्वामी, सोमनाथ बोराटे यांच्या टिमने हे ही कारवाई केली आहे.
पंढरपूर शहरात काही जुगार अड्डा चालक हे आपणाकडे लायसेन्स असल्याचा दावा करतात अशी चर्चा पंढरीत होत होती. व गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही करमणुकीच्या नावाखाली कॅसीनो प्रमाणे असे लायसेन्स दिले जातात असे प्रतिपादनही केले जात होते.मात्र यातील वास्तव काय हे कधीच जनतेसमोर आले नव्हते.आज सलग दुसर्या दिवशी शहरात जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई केल्याने जिल्हा पोलीस प्रमुख विरेश प्रभू यांच्याबाबतचा आदर पंढरी वाढला असून यापुर्वी जिल्हा पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांच्या काळात अशाच धाडसी कारवाया होत होत्या याची आठवणही पंढरपूरकर आवर्जुन काढत आहेत.