पंढरी वार्ता:- दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के कोटयातून प्रवेश देण्यासाठी 43 शाळांची नोंदणी ! लोटस,सिहगड,शांतीनिकेतन गुरुकुल सह विविध शाळांंमधून लवकरच प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

विनाअनुदानीत व नामांकित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाच्या आरटीई ऍक्ट अनुसार सोलापूर जिल्ह्यातील 351 शाळांमधून 3697 विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या पहील्या टप्प्यात शाळांची नोदंणी करण्याची मुदत काल संपली असून राज्यातील इतर जिल्ह्यात या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशासाठीचे वेळापत्रक अजुनही उपलब्ध नसल्याचेच दिसून येत आहे.या प्रवेश प्रक्रियेअर्तंगत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील लोटस स्कुल,कोर्टी येथील सिहगड स्कुल व शांतीनिकेतन गुरुकूल या सारख्या नामांकीत शाळांबरोबरच 43 शाळांनी आरटीई अर्तंगत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश देण्याची तयारी दर्शविली आहे.
   पंढरपूर तालुक्यात आरटीई अर्तंगत 1) ज्ञानदिप प्रायमरी स्कुल चळे 2) श्री विठ्ठल न्यु इंग्लिश स्कुल पांढरेवाडी 3)अभिजीत इंग्लिश मिडियम स्कूल पंढरपूर 4)शांतीनिकेतन गुरुकूल कोर्टी.5)प्राथमिक विद्यालय पेहे 6)किशोर निर्मल इंग्लिश मिडियम स्कुल तारापूर 7)शरदचंद्रजी पवार इंग्लिश मिडीयम स्कूल नांदोरे,8)ज्ञानदिप प्रोगे्रसीव्ह स्कुल नांदोरे9)विठ्ठल प्रायमरी स्कुल 10)पालवी ज्ञानमंदीर टाकळी 11)श्री गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल भंडीशेगाव 12)वसंतराव काळे विद्यामंदीर चंद्रभागानगर भाळवणी 13)शिवराज इंग्लिश मिडीयम स्कुल पोहोरगाव 14)सनराईज पब्लीक स्कुल शेळवे15) आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल वाडेकुरोली 16) कर्मयोगी इंग्लिश मिडीयम स्कुल शेळवे 17) लिटल बल इग्लिश मिडीयम स्कुल करकंब 18)श्री विठ्ठल मॉडर्न स्कुल भोसे 19) प्रोगे्रेस इंग्लिश मिडीयम स्कुल पंढरपूर 20) शिवछत्रपती स्कुल नांदोरे 21) इंडियन नॅशनल स्कुल कोंढारकी 22) बी.डी.माने इंग्लिश मिडीयम स्कुल भंडीशेगाव.23) इंग्लिश मिडीयम स्कुल पंढरपूर 24) लिटल बर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल पंढरपूर 25)स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल पटवर्धन कुरोली.26) लिटल बर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल शेवते 27) लिटल फ्लॉवर स्कुल तिसंगी 28)राजाराम स्कुल पंढरपूर 29) सिहगड पब्लीक स्कुल कोर्टी 30) गॅलॅक्सी इंग्लिश मिडीयम स्कुल करकंब 31)श्री दलींग विद्यामंदीर तारापूर 32) अजितदादा पवार प्राथमिक विद्यालय पंढरपूर 33)मातृ मंदीर प्राथमिक शाळा पंढरपूर 34)ज्ञानप्रबोधीनी प्राथमिक शाळा पंढरपूर 35)क्वालिटी इंग्लिश मिडीयम स्कुल आव्हे 36) एन.के.खरात प्रायमरी स्कुल सोनके 37) ऍमेझॉन इंग्लिश मिडीयम स्कुल तुंगत 38) लोटस इंग्लिश स्कुल कासेगाव 39)शिशुविहार इंग्लिशी मिडीयम स्कुल सुपली.40) प्रदीप मेमोरीयल स्कुल सुस्ते 41) कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर 42)प्रोग्रेस इंग्लिश मिडीयम स्कुल इसबावी 43) होसमनी प्राथमिक मराठी शाळा गोपाळपूर आदी शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेली आहे.
   शाळा नोंदणीच्या पहील्या टप्प्यानंतर आता प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होणार असून याअर्तंगत प्रवेश घेण्यासाठी पुढील कागदपत्रांची गरज आहे.1) रहिवासाचा पुरावा 2) जातीचे प्रमाणपत्र 3) दिव्यांग प्रमाणपत्र 4) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला 5) जन्माचा दाखला 6) घटस्फोटी महिलेचा पाल्य असल्यास घटस्फोटीत असल्याचे कागदपत्रे 7) विधवा महिलेचा पाल्य असल्यास आवश्यक कागदपत्रे 8)अनाथ असल्यास संबधीत कागदपत्रे आवश्यक आहेत.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव