पंढरी वार्ता:- भाडेकरार नोंदविण्याच्या सक्तीने अनेक जागा मालकांची भाडेकरु लपविण्याची युक्ती निरुपयोगी ठरणार ? नगर पालीकेचा 33 टक्के अतिरिक्त कर भरणार कोण ?
भाडेकराराने राहत असलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराची नोंदणी करावी, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त परराज्यातून, इतर शहरातून, इतर जिल्ह्यातून आलेले लाखो नागरिक भाड्याने वास्तव्यास आहेत. त्यांना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराराची नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. तसेच नागरिकांनी त्यांच्या दुकान, घर अथवा इमारतीमध्ये ठेवलेल्या भाडेकरुंची संपर्ण माहिती पोलीसांना देणे बंधनकारक केले आहे.पंढरपूर शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्या जागेत असलेल्या भाडेकरुकडुन भाडयापोटी येणार्या उत्पन्नाची माहीती नगर पालीकेच्या मालमत्ता विभागास कळविणे बंधनकारक असून या जागा भाड्यापोटी मिळणार्या उत्पन्नावर नगर पालीकेडून अतिरिक्त कर आकारणी केली जाते.काही वेळेस ही करण आकारणी एकुण वार्षिक भाडयाच्या 33 टक्के इतकी आहे.पंढरपूर शहरात अनेक स्थावर मालमत्ता धारकांनी आपल्या अतिरिक्त जागा निवसी किवा व्यवसायीक प्रयोजनसाठी भाडयाने दिलेल्या असून भाडेकरुकडून येणारे उत्पन नगर पालीकेस कळवणीने बंधनकारक आहे.
पंढरपूर शहराच्या उपनगरात खुले प्लाट घेवुन बांधकाम करुन तेथे भाडेकरु ठेवून उत्पन्न मिळविणार्यांची संख्या शहराच्या मुख्य भागात मोठया प्रमाणात आहे.त्याच बरोबर शहरात नव्याने बांधण्यात आलेले अनेक निवासी सदनिका संकुले,दुकाने गाळे हे अनेक धनाडया गुंतवणूकदारांनी केवळ गुंतवणूक म्हणून बांधल्याचे दिसून येते.येथील फ्लॅट,बंगलो तसेच दुकानगाळे भाडयाने देवून अनेकांनी डिपॉझीट पोटी मोठया रकमा घेतल्या असून प्रचंड प्रमाणात मासीक भाडेही भाडेकरुकडून वसूल केले जाते.मात्र भाडेकरुंच्या ताब्यात जागा देताना केवळ नोटरीद्वारे अथवा 100 रुपयांच्या मुद्रांकावर भाडेकरार केला जात असल्याचे दिसून येते.नगर पालीकेच्या करविभागाकडून रिवीजनच्या वेळी नियमितपणे भाडेकरुंचे सर्वेक्षण केले जाते.मात्र यामध्ये भाडेकरु अस्तित्वात नाही अशीच नोंद केल्याचे अनेकवेळा दिसून येते.तर याबाबतच्या नियमाची जाण असलेले अनेक जागामालक नोटरीद्वारे करण्यात आलेल्या भाडेकरारात भाडे अतिशय अत्यल्प दाखवून नगर पालीकेचा अतिरिक्त कर वाचविण्याचा खटाटोप करताना दिसून येतात.पंढरपूर शहरातील विविध शासकिय कार्यालयात कार्यरत असलेले मात्र मुळचे पंढरपूर शहरातील नसलेले अनेक शासकिय कर्मचारी हे अशा ठिकाणी नोटरीच्या माध्यमातून भाडेकरार करुन रहात असले तरी या करारामध्ये नमुद केलेले प्रत्यक्ष भाडे,कर्मचर्याने घरभाडे भत्ता मिळविण्यासाठी सादर केलेले जागामालकांसोबतचे करार आणि जागा मालकाने नगर पालीकेत भाडेकरुकडू प्राप्त होत असलेले घरभाडेपोटीचे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याचे अनेकवेळा दिसून येते.
दुकान,गाळा वा इतर स्थावर मिळकती संबंधी भाडेकरार दस्त नोंदणीकृत करण्यात यावे अन्यथा नियमानूसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सह. जिल्हा निबंधक वर्ग - 1, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी दिल्यानंतर अनेक भाडेकरु हे आपला भाडेकरार नोंदणीकृत करा अशी विनवणी जागा मालकांना करीत असल्याचे दिसून येत असून या नोंदणीसाठी होणार खर्च करायचा कोणी व भाडेकरुबाबत अधिकृत माहीती कराराच्या प्रतीसह पोलीस ठाण्यास कळविणे बंधनकारक असल्याने या करारात नमूद केलेल्या भाडयापोटी मिळणार्या रकमेची माहीती नगर पालीकेस मिळणार असून भाडेकरुसाठी असलेला अतिरिक्त कर भरावयाचा कोणी असा वाद आता जागामालक आणि भाडेकरु यांच्यात उत्पन्न होणार असल्याचे दिसून येत आहे.मात्र मुंद्रांक जिल्हाधिकार्यांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास नगर पालीकेचे उत्पन्न मात्र लाखो रुपयांनी वाढणार आहे.