पंढरी वार्ता:- पंढरीच्या सुरक्षेसाठी के.पी.एम.जी.च्या सहाय्याने 56 कोटी खर्चाचा डि.पी.आर.शासनास सादर ! आ.भालकेंच्या लक्षवेधीस मुख्यमंत्र्याचे उत्तर प्रमुख ठिकाणी 175 कॅमेरे तर 108 ठिकाणी उदघोषणा प्रणाली बसविणार !
पंढरपूर शहरास असलेल्या संभाव्य दहशतवादी धोक्याबरोबरच येथे येणार्या भाविकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने पंढरपूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते,चौक आदी ठिकाणी 178 सी.सी.टि.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याच बरोबर सुरक्षेच्या व इतर महत्वपुर्ण सुचना करण्यासाठी 108 ठिकाणी उदघोषणा प्रणाली बसविण्यात येणार आहे.याबाबतचा संपुर्ण प्रकल्प अहवाल के.पी.एम.जी.ने पोलीस महासंचालकांच्या मार्फत शासनाकडे 5 ऑगस्ट 2017 रोजीच सादर केला असून यामध्ये एक आदेश व डेटा संकलन केंद्राचाही समावेश आहे.हा संपुर्ण प्रकल्प अहवाल माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठीविण्यात आला असून लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल अशी माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.भारत भालके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेशी प्रश्नास उत्तर देताना दिली आहे.
