पंढरी वार्ता:- एस.टी.कामगारांची ग्रुप भिशी ठरणार सावकारी ! कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे ना.रावतेंचे आदेश

अतिशय तुटपुंज्या व वेळेवर होत नसलेल्या पगारात काम करणार्‍या एस.टी.कर्मचार्‍यांनी आपले अर्थिक प्रश्‍न सोडविण्यासाठी एकत्र येवून सहकारी बँक आणि विविध ठिकाणी पतसंस्थाही स्थापन केल्या आहेत.मात्र अनेकवेळा संघटनेच्या सभासदत्वाचा अडसर तर बँकेत असललेल्या ठेवीपेक्षा कर्जमागणीच जास्त असल्याने गरजेच्या वेळी कर्ज मिळण्याची खात्री नसल्याने तसेच काही ठरावीक ठिकाणीच एस.टी.कामगाराच्या स्वतंत्र के्रडीट सोसायटीचे अस्तित्व असल्याने पंढरपूर सह राज्यभरातील अनेक एस.टी.डेपो मध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचार्‍यांनी पुढाकार घेत भिशी पध्दत सुरु केल्याचे दिसून येते.गरजेच्या वेळी यातील सभासदांना अत्यल्प व्याज आकारुन कुठल्याही कागदपत्राशिवाय ऊचल स्वरुपात रक्कम दिली जाते व त्याची परतफेड मासिक हप्त्याने कर्मचारी करतात.मात्र एस.टी.कामगार संघटनामध्ये असणारे राजकारण आता छोटीमोठी गरज भागविण्याच्या या  भिशी पध्दतीच्या मुळावर उठले असून  अशा प्रकारे भिशी चालवीणार्‍या काही कर्मचार्‍यांविरोधात थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यंत तक्रारी गेल्याने ही भिशी चालविणार्‍या व बेकदायदा सावकारी करणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत.
       मात्र या भिशीचा कुठलाही कागोदपत्री व्यवहार नसल्याने हे आदेश आमलात येणे कठीण आहे.या बाबत सुरक्षा आणि दक्षता विभागाने तातडीने परिपत्रक काढून राज्यभरातील आगारांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. काही कर्मचारी अडचणीच्या काळात सावकाराकडे जातात व त्यांची आर्थिक लूट होते, अशा तक्रारी आल्या होत्या.काही कर्मचारी भिशीच्या नावाखाली अवैध सावकारीचा धंदाही करत आहेत. अशा कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया
यांनी दिले आहेत.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव