पंढरी वार्ता :- सरस्वती विद्यालय व कै.भिमराव महाडिक कनिष्ठ महाविद्यालयात दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील सरस्वती विद्यालय व कै.भिमराव महाडिक कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठया उत्साहात व भावपुर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले व सचिव श्रीधर बिरजे,ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले साहित्त्यीक कवी रवी सोनार यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी या शाळेतील आपले अनुभव कथन करीत अतिशय भावुक होऊन आपले मनोगत व्यक्त केले.सरस्वतीच्या प्रांगणात आमच्यावर पुत्रवत मायाकरणारे शिक्षकवृंद आम्हास भेटले.त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि संस्कार आम्हास आयुष्यभर प्रगतीच्या आणि ध्येयाच्या वाटेवर नेणार असल्याचे सांगीतले.या कार्यक्रामाच्या निमित्ताने साहित्यीक कवी रवी सोनार यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्र.मुख्याध्यापक तानाजी अनुसे,पर्यवेक्षक तानाजी चव्हाण व श्री देशपांडे सर,श्री कोळेकर सर,श्री जाधव सर आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री यादव सर यांनी केले.तर शेवटी आभार प्रदर्शन श्री गायकवाड सर यांनी मानले.