पंढरी वार्ता:- वृक्षारोपणाचा आढावा केव्हा घेणार ? पंचायत राज सदस्यांनाही पडला शासन आदेशाचा विसर !
राज्यात मोठया प्रमाणात वृक्षसवंर्धन करण्याच्या हेतूने शासनाने गतवर्षी प्रत्येक शासकिय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपमचायत यांच्या माध्यमातून महत्वाकांक्षी वृक्षलागवड योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता.व प्रत्येक जिल्हानिहाय वृक्षारोपणाचे लक्ष निर्धारीत करून कोटयावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र भ्रष्टाचारी प्रवृत्तींना व वृक्षलागवडीचे काम करणार्या संबधीत एजन्सींजना बनावटगीरी करता येवू नये या उद्देशाने शासनाने आता या योजनेवर जिल्हा निहाय झालेला खर्च लक्षात घेवून दिलेल्या लक्षांकाप्रमाणे वृक्ष लागवड झाली आहे की नाही,ही रोपे जिवंत आहेत का ? शासनाच्या नियमाप्रमाणे या रोपांचे संगोपन करण्याची काळजी घेतली जाते का ? याचा आढावा जिल्हापातळीवरीळ तसेच तालुका पातळीवरील प्रत्येक बैठकीत संबधीत अधिकार्यांनी घ्यावा तसेच दिलेल्या टार्गेटनुसार वृक्षारोपण आणि त्यांचे जतन केले जाते का याचाही प्रत्येक बैठकीत आढावा घेतला जावा असे आदेश दिले होते.पंचायत राज समिती सदस्यांच्या पंढरपूर दौर्यात विविध विकासकामे आणि शासकिय योजना यांचा आढावा घेण्यात आला.मात्र या बैठकीत शासनाचे आदेश असतानाही वृक्षारोपणाचा आढावा घेतला गेला नसल्याचेच दिसून येते.
कोटयावधी रुपये खर्चुन राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहीमेचा तालुका, जिल्हा आजि राज्यस्तरावरील अधिकारी यांनी वेळोवेळी
वृक्ष लागवड करण्यात आलेल्या ठिकाणी आर्वजून भेटी द्याव्यात असे आदेश शासनाने दिले आहेत.या बरोबरच संबधीत विभागाने कार्यालय स्तरावर रोपांचे योग्य पध्दतीने संगोपन केले आहे की नाही,रोपांचे संरक्षण सुयोग्य पध्दतीने केले जाते का ?मृत रोपांच्या बदल्यात नवीन रोपे लावली गेलीत का ? त्याच बरोबर पाण्याची व्यवस्था आणि संरक्षणासाठी मनुष्यबळ इत्यती बाबींची वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी करावी असे आदेश शासनाने दिले होते. शासनाच्या या महत्वपुर्ण योजनेनुसार वृक्षारोपण केल्यानंतर हात झटकून मोकळे झालेल्या रोपांना निसर्गाच्या भरवशावर सोडून मोकळे झालेल्या ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक आहे.
पंचायत राज समिती सदस्यांच्या आढावा बैठकीत याबाबत नक्की काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात असून वृक्षारोपण करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेल्या ठिकाणी फेरफटका मारला असता अनेक रोपे जळून गेलेली दिसून येतात.मात्र याबाबत कोटयावधींचा निधी खर्च केला जात असताना केले जाणारे दुर्लक्ष अक्षम्य असून या वृक्षारोपणचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत स्वतंत्र आढावा बैठक घेतली जावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून केली जात आहे.