पंढरी वार्ता:-बहुजन क्रांती मोर्चाची पंढरपूरात प्रबोधन सभा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 388 व्या जयंती निमित्त बहुजन क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून प्रबोधन सभेचे आयोजन दि 19फेब्रुवारी रोजी येथील  "शिवतिर्थ" शिवाजी चौक पंढरपूर येथे करण्यात आले होते. 
 सभेचे उदघाटन श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन फडतरे , संभाजी बिग्रेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल,बामसेफचे जेष्ठ कार्यकर्ते सुनिल वाघमारे आदी मान्यवरांनी आपले विचार वक्त केले.
या प्रबोधन सभाचे अध्यक्ष बामसेफचे प्रचारक सचिन अब्दुले यांनी प्रबोधन सभेला संबोधित करताना अब्दुले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वावर चालत होता.शिवकाळात शेतकरी सुखी होता.छत्रपती शिवरायांच्या मृत्यू नंतर त्यांचा वारसा त्यांचे पराक्रमी पुत्र संभाजी महाराजांनी चालविला.संभाजी राजे प्रचंड बुद्धीमान संस्कृत चे गाढे अभ्यासक तसेच धर्मचिकित्सक होते.त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.अनेक विदेशी इतिहासकारांनी संभाजी महाराजांचा उल्लेख बुद्धीमान आणि पराक्रमी राजा असा केलेला आहे मात्र महाराष्ट्रात कथा नाटके आणि चित्रपटांतून  संभाजी महाराजांना वेळोवेळी बदनाम करण्याचे प्रयत्न झाले.संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाच्या आदेशानुसार झाली तर मग महाराष्ट्रात मोगलाई येण्याऐवजी  पेशवाई कशी काय आली? हा प्रश्न बहुजनांना पडायला हवा.या प्रश्नाची उकल व्हायला हवी.संभाजी राजांच्या मृत्युनंतर जी पेशवाई आली त्यात जातीव्यवस्था अत्यंत वाईट रितीने राबविण्यात आली.ती पेशवाई १८१८ साली संपवली.आज बहुजनातील कुठलाही सामाजिक समुह सुखी नाही.शेतकरी मजूर महिला विद्यार्थी या सर्वांना अधिकारांपासून वंचित ठेवले आहे.हे संपवण्यासाठी पुन्हा एकदा संघठीत होऊन आधुनिक पेशवाई विरोधात संघर्ष करणे गरजेचे आहे. अशा प्रभावी शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले . 
यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक रवी सर्वगोड , तेजस कलुबर्मे , हरिविजय नागणे , राहुल धाईंजे ,प्रशांत बाबर , राहुल भोसले , लखन माने , अक्षय सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर प्रबोधन सभेला पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते,  बहुजन बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव