पंढरी वार्ता:- पंढरपूर युवक कॉग्रेसकडुन मुख्याधिकारी बापट यांच्या बदलीची मागणी ! प्रांताधिकार्यांना दिले निवेदन !
पंढरपूर नगर पालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे राजकारण करीत असून नगर पालीेकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जात असताना मुळ निमंत्रण पत्रीकेत त्यांनी आ.भारत भालके यांचे नाव केवळ राजकीय दबावापोटी वगळले आहे.या बाबत विविध राजकीय पक्ष,संघटना यांच्याकडुन विरोध होताच व प्रचंड संताप व्यक्त होत असल्याचे पाहून नंतर त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे दुसरी निमंत्रण पत्रीका छापून घेतली.जनतेचे आमदार असलेल्या आमदार भारत भालके यांचे नाव वगळून विधानपरिषदेतून निलंबीत करण्यात आलेले आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव टाकून मुख्याधिकारी बापट यांनी लोकशाहीचा अवमान केला आहे.
या बाबत तीव्र निषेध होत असल्याचे पाहून मुख्याधिकारी बापट यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकून नगर पालीकेच्या इतर कर्मचार्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची तातडीने बदली करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.हे निवेदन देताना युवक कॉग्रेसचे अध्यक्ष अमित डोंबे,समाजसेवक महादेव धोत्रे,आकाश कौलवार,बाबा लगसकर,कृष्णा कवडे,शहाजी शिंदे,नरेश सचदेव,गोरख पांढरे,विशाल केंगार यांच्यासह युवक कॉग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.