सा.पंढरी वार्ता :- रस्ता रुंदीकरणात बाधीत होणार्‍या रस्त्यावरील व्यवसायांचे मुल्यांकन करुन भरपाई द्या ! शिवबुध्द युवाप्रतिष्ठाणचा उपोषणाचा इशारा

भजनदास चौक ते सोलापूर रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधीत होणार्‍या जागा मालकांचे व्यवसाय व दुकाने अस्तित्वात असतानाही दुकाने,व्यवसाय उपलब्ध नसल्याचा उल्लेख आवार्डमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे नुकसानभरपाई पासून हे दुकानचालक मालक  वंचीत राहणार आहेत.त्यामुळे या रस्त्याचा फेरसर्व्हे करुन येथे सद्यस्थितीत सुरु असलेल्या दुकानांचे मुल्यांकन करण्यात यावे व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवबुध्द प्रतिष्ठाणच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    या बाबत माहीती देताना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप मुटकुळे म्हणाले की,भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लवरकच हाती घेण्यात येणार असून बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांना नोटीसाही बजावण्यात आलेल्या आहेत.व नुकसान भरपाईपोटीचे आवार्डही देण्यात आलेले आहेत.यामध्ये या रस्त्यावर बाधीत होणार्‍या मालमत्ता धारकांची दुकाने व विविध व्यवसाय अस्तित्वात असतानाही व त्यांच्याकडे याबाबत शॉप ऍक्ट लायसेन्ससह विविध पुरावे आहेत.व अनेक बँकानी अशा दुकानदारांना व्यवसायासाठी कर्जपुरवठाही केलेला आहे.तरीही   व्यवसायच अस्तित्वात नसल्याचे प्राताधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आवार्डमध्ये नमूद करण्यात आहे. ही बाब अतिशय अन्यायकारी व बाधीत होणार्‍या मिळकतदारांचे मोठे अर्थिक नुकसान करणारी आहे.तेव्हा तातडीने याबाबत योग्य ते फेरबदल करुन व्यवसायाची नोंद करण्यात यावी अन्यथा शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2018 पासून येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
   हे निवेदन देताना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष किरण शहा,युवक जिल्हाध्यक्ष योगेश कांबळे,पप्पू गवळी आदी उपस्थित होते.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव