पंढरी वार्ता:- पंढरपूरातील रखडलेल्या सी.सी.टिव्ही प्रकल्पाचा प्रश्‍न विधानसभेत ! आ.भारत भालके यांनी व्यक्त केली नाराजी !

पंढरी वार्ता:- पंढरपूरातील रखडलेल्या सी.सी.टिव्ही प्रकल्पाचा प्रश्‍न विधानसभेत !
 आ.भारत भालके यांनी व्यक्त केली नाराजी !

संत तुकाराम महाराज चर्तुंजन्मशताब्दी तिर्थक्षेत्र विकास आराखडयाअर्तंगत पंढरपूर शहरातील प्राधान्याने करण्यात येणार्‍या कामांमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी व मंदीरास असलेल्या संभाव्य धोक्याचा लक्षात घेत व यात्रा काळात शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी येथील प्रमुख रस्ते,प्रदक्षिणा मार्ग,विविध महत्वपुर्ण चौकाच्या ठिकाणी सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियंत्रण एकाच ठिकाणी ठेवण्याचे प्रस्तावित होते.यासाठी साडे सहा कोटी रुपयांच्या आसपास निधीही उपलब्ध करण्यात आला होता.मात्र गेल्या आठ वर्षापासून शहराच्या सुरक्षेच्या द्रष्टीकोनातून महत्वपुर्ण असलेला हा प्रकल्प रखडलेला आहे.याबाबत त्रीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार भारत भालके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित केला असून मंगळवारी या प्रश्‍नावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.
    शासनाच्या विकास आराखडयातील हा महत्वपुर्ण व सुरक्षेच्या द्रष्टीकोनातून अतिआवश्यक प्रकल्प रखडलेला असला तरी ‘काहीजण’ शहरातील विविध हॉटेल चालक,दुकानदार,ज्वेलर्स शॉप यांना ‘खाजगीत’ भेटून शहरात सी.सी.टीव्ही कँमेरे बसविण्याचे महत्व पटवून देत आहेत अशीही चर्चा पंढरपूर शहरात दबक्या आवाजत होत आहे.मात्र आता आमदार भारत भालके यांनी हा प्रश्‍न थेट विधानसभेत उपस्थित केल्यामुळे मंगळवारी याबाबत मुख्यमंत्री काय उत्तर देतात याकडे पंढरपूर  शहरातील‘वर्गणीदारांचे‘ लक्ष लागले आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव