पंढरी वार्ता:- ‘श्रीमंताच्या(?)’शाळेत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत बुधवारी संपणार ! ‘घुसखोरी’ टाळण्यासाठी अर्जाच्या काटेकोर पडताळणीची गरज
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणार्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढणार असल्याचे संकेत शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिले आहेत. राज्यभरातून याला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत राज्यभरातून 1 लाख 30 हजार 390 पालकांनी यासाठी अर्ज केला आहे.पंढरपूर शहर व तालुक्यातील 43 शाळांनी आरटीई अर्तंगत प्रवेशासाठी अर्ज मागविले असून यामध्ये पंढरपूर तालुक्यात आरटीई अर्तंगत 1) ज्ञानदिप प्रायमरी स्कुल चळे 2) श्री विठ्ठल न्यु इंग्लिश स्कुल पांढरेवाडी 3)अभिजीत इंग्लिश मिडियम स्कूल पंढरपूर 4)शांतीनिकेतन गुरुकूल कोर्टी.5)प्राथमिक विद्यालय पेहे 6)किशोर निर्मल इंग्लिश मिडियम स्कुल तारापूर 7)शरदचंद्रजी पवार इंग्लिश मिडीयम स्कूल नांदोरे,8)ज्ञानदिप प्रोगे्रसीव्ह स्कुल नांदोरे9)विठ्ठल प्रायमरी स्कुल 10)पालवी ज्ञानमंदीर टाकळी 11)श्री गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल भंडीशेगाव 12)वसंतराव काळे विद्यामंदीर चंद्रभागानगर भाळवणी 13)शिवराज इंग्लिश मिडीयम स्कुल पोहोरगाव 14)सनराईज पब्लीक स्कुल शेळवे15) आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल वाडेकुरोली 16) कर्मयोगी इंग्लिश मिडीयम स्कुल शेळवे 1%) लिटल बल इग्लिश मिडीयम स्कुल करकंब 18)श्री विठ्ठल मॉडर्न स्कुल भोसे 19) प्रोगे्रेस इंग्लिश मिडीयम स्कुल पंढरपूर 20) शिवछत्रपती स्कुल नांदोरे 21) इंडियन नॅशनल स्कुल कोंढारकी 22) बी.डी.माने इंग्लिश मिडीयम स्कुल भंडीशेगाव.23) इंग्लिश मिडीयम स्कुल पंढरपूर 24) लिटल बर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल पंढरपूर 25)स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल पटवर्धन कुरोली.26) लिटल बर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल शेवते 2%) लिटल फ्लॉवर स्कुल तिसंगी 28)राजाराम स्कुल पंढरपूर 29) सिहगड पब्लीक स्कुल कोर्टी 30) गॅलॅक्सी इंग्लिश मिडीयम स्कुल करकंब 31)श्री दलींग विद्यामंदीर तारापूर 32) अजितदादा पवार प्राथमिक विद्यालय पंढरपूर 33)मातृ मंदीर प्राथमिक शाळा पंढरपूर 34)ज्ञानप्रबोधीनी प्राथमिक शाळा पंढरपूर 35)क्वालिटी इंग्लिश मिडीयम स्कुल आव्हे 36) एन.के.खरात प्रायमरी स्कुल सोनके 37) ऍमेझॉन इंग्लिश मिडीयम स्कुल तुंगत 38) लोटस इंग्लिश स्कुल कासेगाव 39)शिशुविहार इंग्लिशी मिडीयम स्कुल सुपली.40) प्रदीप मेमोरीयल स्कुल सुस्ते 41) कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर 42)प्रोग्रेस इंग्लिश मिडीयम स्कुल इसबावी 43) होसमनी प्राथमिक मराठी शाळा गोपाळपूर आदी शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेली होती.
या सवलती अर्तंगत पंढरपूर शहरातील काही ठरावीक बडया संस्थाचालकांच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अनेक प्रतिष्ठीत‘गरीब’ पालकांनी फिल्डींग लावली असून उद्या या प्रवेश प्रक्रियेची मुदत संपणार असली तरी या बाबत मुदतवाढीची शक्यता वर्तविली जात आहे.मात्र बडया संस्थाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य दिलेल्यांची मोठी गर्दी असून आलेल्या अर्जाची नियमानुसार पडताळणी केली जावी मगच पुढील प्रवेश प्रक्रिया राबवीली जावी अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.आरटीई प्रवेशाबाबत काही शाळांनी बहिष्काराची भूमिका घेत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शुल्कपरतावा वेळेत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर न्यायालयाने 28 तारखेपर्यंत या शाळांवर कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू असून काय निर्णय होतो, आहे ते पाहणे गरजेचे आहे. यावर अजून राज्य शासनाने केवळ आपले म्हणणे सादर केले असून त्यावर निर्णय झालेला नाही. न्यायालय या शाळांबाबत काय भूमिका घेते आहे, हे पाहण्यासाठीच ही मुदतवाढ दिली जात असल्याचीही शिक्षण विभागात चर्चा आहे.