पंढरी वार्ता:- शरद प्रतिष्ठाणने केली फसव्या सरकारच्या आदेशांची प्रतिकात्मक होळी ! सरकारच्या नावे बोंब ठोकून केला शासनाचा निषेध !
मराठा आरक्षाणचे आश्वासन बासणात,धनगर आरक्षणाबाबत चालढकल,शेतकर्यांची फसवी कर्जमाफी ,1300 शाळा बंद करुन गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचे धोरण आणि जी.एस.टी.सारख्या जाचक प्रणालीमुळे थंडावलेला व्यापार व्यवसाय यामुळे राज्यात या सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे त्यामुळे
आज आम्ही या अन्यायी सरकारची प्रतिकात्मक होळी करुन शासनाच्या विरोधात बोंब ठोकून शासनास जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत अशी माहीती शरद प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिली आहे.
गुरसाळे -टेंभुर्णी रस्ता ता.पंढरपूर येथे होळी सण अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला असून शासनाच्या वतीने सातत्याने अन्यायी धोरणे राबविण्यात येत आहेत.या धोरणांच्या निषेधार्थ वेळोवेळी मोर्चे,आंदोलने करुन देखील शासनास जाग येत नसल्याने आज येथील ग्रामस्थ व शरद प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांच्या प्रतींची प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्याबरोबरच शासनाविरोधात बोंब ठोकल्याचे दिसून आले.
यावेळी बालाजी खंदारे,पोपट चव्हाण,सोमा ढवण,नाना खरतडे,सोमा जाधव,दिपक कवडे,राहुल पवार,सुखदेव भोसले,बालाजी पवार,दिपक माने,प्रशांत पवार,नवा वाघमारे,शिवाजी चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.