पंढरी वार्ता:- ‘डबल रोल’ मधील फार्मासिस्टवर कारवाईची गरज ! माहीती देण्यास औषध प्रशासनाची टाळाटाळ !

रोगांचे निदान,प्रतिबंध व चिकित्सा यांसाठी औषधिद्रव्यांच्या मात्रा निश्चित करणे, प्रमाणीकरण, विश्लेषण व परीक्षण करणे तसेच योग्य तर्‍हेने साठवण औषधांची ने-आण व औषधांची विक्री यासाठी प्रत्येक औषध विक्री दुकानात फार्मासिस्टच्या उपस्थितीत औषध विक्री करणे बंधनकारक आहे.आणि याबाबतच्या सर्व नियम व अटींची पुर्तता होते की नाही याची तपासणी करण्याचे व कारवाई करण्याचे सर्वस्वी अधिकार औषध प्रशासनाचे आहेत.औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम 1940 नुसार औषध  दुकानाचा परवाना असलेल्या केमिस्ट दुकानात रजिस्टर्ड ङ्गार्मासिस्टची पूर्ण वेळ उपस्थिती बंधनकारक आहे. 8 तासाहून जास्त वेळ सुरु असलेल्या, एका पेक्षा जास्त कौंटर असणार्‍या औषध दुकानांत जादाचे ङ्गार्मासिस्ट नेमणे बंधनकारक आहे. रजिस्टर ङ्गार्मासिस्ट बनायचे असल्यास कमीत कमी डी ङ्गार्म अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.मात्र अनेक हॉस्पिटल्स व आयसीयु सेंटर तसेच इतरही ठिकानी असलेल्या औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट अभावानेच उपस्थित असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.रुग्णास चुकीचे अथवा डॉक्टरनी दिलेल्या प्रिस्किप्शन मधील औषध बदलून चुकीचे औषध दिले गेल्यास रुग्णाच्या जिवीतासही धोका उत्पन्न होऊ शकतो.मात्र संपुर्ण जिल्ह्यातील मेडीकल दुकानांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सोलापूर येथील जिल्हा औषध प्रशासन अधिकार्‍याकडून मोजक्या कर्मचार्‍यांच्या मदतीने केले जाते.त्यामुळे सामान्य जनतेच्या अतिशय जिव्हळ्याच्या प्रश्‍नाचे महत्व लक्षात घेवून औषध प्रशासनाचे विभागीय कार्यालय पंढरपूरात होण्याबरोबरच या विभागातील‘डबल रोल’भुमिका वटविणार्‍या फार्मासिस्टवर कारवाई होणे अपेक्षीत आहे.
         यापुर्वी बड्या औषध कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून पूर्णवेळ काम करणार्‍या व्यक्तीच्या नावावर बोगस ङ्गार्मासिस्ट परवाना मिळवून औषधांचे दुकान चालविले जात असल्याचा अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे. व तक्रार आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (एङ्गडीए) संबंधित मार्केटिंग मॅनेजरसह दुकानमालकावर कारवाईही केली होती.अन्न व औषध प्रशासनाने राबवलेल्या धडक मोहिमेमुळे महाराष्ट्रातील औषधविक्री क्षेत्रामध्ये गल्लेभरू व धंदेवाईकपणा आणू पाहणार्‍या व्यापारी वृत्तीला चाप लागला. मात्र त्यामधूनही बाजारू पळवाट शोधून काढण्यासाठी महाराष्ट्रातील काही व्यापारी अन्य राज्यांतील बोगस कॉलेजांतून डी-ङ्गार्माची पदवी 60 हजार रुपयांच्या मोबदल्यात देत आहेत. विशेष म्हणजे ही पदवी मिळवण्यासाठी चार परीक्षांपैकी शेवटच्या परीक्षेत 100पैकी अवघे 22 गुण मिळवणे बंधनकारक आहे. या 22 गुणांसाठी विचारण्यात येणार्‍या प्रश्नांची सोयही या बोगस कॉलेजांनी पैसे भरता क्षणीच दिलेल्या नोट्समध्ये करून ठेवलेली आहे.औषधांची विक्री करत असताना अन्न व औषध प्रशासनाने औषधनिर्माण कायद्यान्वये दिलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.मात्र या बाबत तपासणी व कारवाई करण्याची यंत्रणाच अपुरी असल्याने हा सारा मामला संशयास्पद बनला आहे.
    सोलापूर जिल्ह्यातील परवानाप्राप्त दुकाने व तेथील नोंदणीकृत फार्मासिस्ट यांची सविस्तर माहीती मिळावी यासाठी पंढरपूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद लोंढे यांनी सोलापूर येथील औषध प्रशासनाकडे काही महिन्यापुर्वी माहीती अधिकारात विचारणा केली होती मात्र ही सर्व माहीती इंटरनेटवर उपलब्ध आहे असे सांगून माहीती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.मात्र आपण या बाबत कारवाईसाठी गरज पडली तर आंदोलनही छेडणार असल्याची माहीती आनंद लोंढे यांनी पंढरी वार्ताच्या प्रतिनिधीशी  बोलताना दिली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव