पंढरी वार्ता:- वर्गणी कुणाची अन् कल्याण कुणाचे ? ‘कामगार कल्याण’च्या योजनांपासून असंघटीत कामगार वंचीत !
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अनुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील दुकाने,व्यवसायीक आस्थापना,संस्था व कारखाने यांच्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांच्या कल्याणसाठी विविध योजनार राबविण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र कामगार कल्याण विभागाची स्थापना केली.या विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि नसलेल्या वर नमूद केलेल्या सर्वच आस्थापना मधील नियमीत,हंगामी,कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबास मदत करता यावी या हेतूने कामगार आणि मालक वर्गंणी आणि शासनाचे अंशदान अशा स्वरुपात निधी उपलब्ध करुन योजना राबविल्या जातात.मात्र पंढरपूर शहर तालुक्यातील खाजगी व्यवसायीक कामगार कल्याणची वर्गणी भरत असतानाही अनेक खाजगी असंघटीत कामगार कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध योजनांंपासून वंचीत रहात असल्याचे दिसून येते.विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख यांच्याकडे कामगार मंत्रीपदाचा जबाबदारी असतानाही खाजगी असंघटीत कामगारांना लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कमागार कल्याण अधिनियम 6 ब नुसार मालक,कामगार आणि शासन हे समान हिश्श्यात कामगार कल्याण निधीची उभारणी करीत असुन कामगारांची नोंद ठेवून त्यांची वर्गणी भरण्याची जबाबदारी मालकवर्गाची असते.पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक नोंदणीकृत खाजगी व्यवसायीक कामगार कल्याणची वर्गणी नियमितपणे वर्षानुवर्षे भरत असल्याचे दिसून येते.मात्र कामगार कल्याण मंडळामार्फत राबिविण्यात येणार्या योजनांचा लाभ खाजगी क्षेत्रात काम करणार्या असंघटीत कामगार वर्गास फारसा होत नसून साखर कारखाने,सुत गिरण्या,मोठ मोठे कारखानदार यांच्याकडे काम करणार्या कामगारांनाच केवळ याचा लाभ काही प्रमणात मिळतो.त्याच वेळी खाजगी कामगारांची वर्गणी भरली जात असतानाही केवळ ते असंघटीत असल्याने विविध योजनांपासून वंचीत रहात आहेत.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य,5 हजार ते 15 हजार क्रिडा शिष्यवृत्ती,पाठयपुस्तकासाठी खरेदी रकमेच्या 50 टक्के अर्थिक मदत.एमएससीआयटीसाठी फीच्या 50 टक्के रक्कमेचे अर्थसहाय्य,अपंग कामगारांना विशेष सवलत,गंभीर आजार झाल्यास तातडीने 25 हजारापर्यंत अर्थसहाय्य,अपघाताने अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य,आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबास अर्थसहाय्य याच बरोबर विविध योजनांचा लाभही कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांना देण्यात येतो.पंढरपूर शहर व तालुक्यात संघटीत कामगारांना लाभ दिला जात असल्याचे कामगार कल्याण मंडळाचे जिल्ह्यातील अधिकारी सांगत असले तरी पंढरपूर शहर व तालुक्यात खाजगी क्षेत्रात काम करणारे असंघटीत कामगारांची वर्गणी मालकवर्गाकडून भरुन घेतली जात असतानाही विविध योजनांपासूण हे असंघटीत कामगार वंचीत रहात असल्याचे दिसून येते.