पंढरी वार्ता:- यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम निम्म्यावर ! केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांवर व्यक्त केलेला अविश्वासामुळे व्रतस्थ शिक्षक नाराज !
पुढील वर्षीपासून शालेय अभ्यासक्रम निम्म्यावर आणण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.सध्याचे शालेय अभ्यासक्रम हे कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे.
त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवरही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत गोष्टी शिक्षकांनी समजून घ्यायला हव्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील तयारीस मदत करायला हवी.
दप्तराचे ओझे कमी होण्यासंदर्भात नागपूरच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली होतीे. या याचिकेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना व उपाययोजना करताना येणा-या अडचणी यांबाबत नेमके उपाय सुचविण्यासाठी शासनाने समिती स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागास दिले होते. सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या मात्र या उपाययोजना करताना शाळा व सरकारला यश आले नाही. याउलट बदलता अभ्यासक्रम व स्पर्धेमुळे दिवसेंदिवस दप्तराचे ओझे वाढतच आहे. अभ्यासक्रमात होत असलेले बदल, पुस्तकांची वाढलेली संख्या यांमुळे दप्तराचे ओझे कमी करण्यात शाळांना अडचण येत आहे. विद्यार्थ्यांचे दप्तर कमी करण्यासाठी यापूर्वीही अनेक उपाय सुचविण्यात आले होते. नवीन अभ्यासक्रम, वाढलेले विषय, प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक, वह्यांचा खर्च, वेगवेगळ्या लेखन साहित्याची गर्दी यांमुळे दप्तराचे ओझे कमी झालेच नसल्याचे दिसून आले आहे.आता थेट केंद्रानेच याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असला तरी हा शिक्षकांच्या कार्यक्षमतेबाबत ना.प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलेली शंका अनेक व्रतस्थ शिक्षकांना जिव्हारी लागली आहे.