पंढरी वार्ता:- छावा क्रांतीवीर सेनेच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप जाधव यांची निवड !

छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी येथील प्रदीप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना या निवडीचे पत्र छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज लटके यांच्या हस्ते तर छावा क्रांतीवीर सेनेच्या विद्यार्थी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पत्र प्रदान करण्यात आले.
    छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात विविध समााजिक समस्या तसेच समाजाच्या महत्वपुर्ण प्रश्‍नाबाबत आवाज उठविण्याबरोबरच संघर्षही केला जात आहे.या युवक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना प्रदीप जाधव हे निश्‍चितच कर्तव्यदक्ष राहून व तत्परतेने कार्य करतील असा विश्‍वास यावेळी जिल्हाध्यक्ष धनराज लटके यांनी व्यक्त केला.
       यावेळी रामा कांबळे,औदुंबर अवघडे,औदुंबर निकम,महेश सुडके,निलेश देशमुख,विकास जाधव,सोयद भगवान,रोहीत गायकवाड,प्रसाद पवार यांच्यासह मंगळवेढा तालुक्यातील छावा क्रांतीवीर सेनेच्या युवक विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव