पंढरी वार्ता:- रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम निकृष्ट आणि चुकीच्या पध्दतीने होत असल्याची नगरसेवक घोडके यांची तक्रार ! उपनगरातील नागरिक धुळीला व वारंवार होणार्‍या अपघातांना वैतागले ! तर निकृष्ट काम होत असल्याने संताप

पंढरपूर शहरातील भाई राऊळ पुतळा पदमाती उद्यान ते टाकळी रस्ता या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेवून दिड वर्षाचा कालावधी पुर्ण होत आला तरी हे काम ठेकेदाराकडून अतिशय धिम्यागतीने तसेच निकृष्ट पध्दतीने केले जात असून जागोजागी उघडे चेंबर,अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावर आलेले ड्रेनेज पाईप आणि अनेक दिवस पसरून ठेवलेली घडी यामुळे परिसरातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या रस्ता कॉक्रीटकरणाच्या कामाची सखोल चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागनी नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके यांनी नगर पालीकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.
             या बाबत अधिक माहीती देताना नगरसेविका रेणूका घोडके म्हणाल्या की,या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरुवातीपासूनच चुकीच्या पध्दधतीने केले जात आहे.रस्त्याचे कॉ्रंकीटीकरण केले जात असताना दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी फुटके पाईप टाकण्यात आले आहेत.तर लेव्हल न काढताच केवळ पाईप पुरण्यात आल्याचाही प्रकार घडला आहे.त्यामुळे भविष्यात या रस्त्यावरील ड्रेनेजलाईन तुंबल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.हे काम सुरु असल्याचे फलक व धोकादायक ठिकानी धोक्याचा इशारा देणारे फलक ठेकेदारकडून लावणे अपेक्षीत आहे.मात्र त्याची कार्यवाही ठेकेदाराकडून केली जात नाही.त्यामुळेच नुकतीच एक वयोवृध्द महीला पद्मावती बागेसमोरील चेंबरमध्ये पडून जख्मी झाली होती.या रस्त्याचे काम सरु झाल्यापासून या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत.या बाबत नगरसेवक या नात्याने या ठेकेदाराशी संपर्क करुन रस्त्याचे काम सरु असलेल्या ठिकाणी धोकादर्शक फलक लावण्यात यावेत तसेच अनेक ठिकाणी एकाच बाजुने रस्त्याचे कॉक्रीटकरण झाले असल्याने या ठिकाणी धोकादर्शक रेड रिबनचा वापर करण्यात यावा अशी मागणी केली होती.मात्र सदर ठेकेदार कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून येते.
           या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून वेळेत पुर्ण करण्यात आले नाही.अतिशय संथ गतीने काम करण्यात येत आहे.तसेच ज्या ठिकाणी कॉक्रीटीकरणाचे काम झाले आहे त्या ठिकाणच्या कॉक्रीटला जागोजागी आताच तडे पडत आहेत.या रस्त्यावरील रेल्वे प्रवेशद्वाराच्या ठिकाणी ठेकेदाराने गेल्या अनेक दिवसापासून कचखडी टाकून ठेवली आहे.मात्र त्यावर रोलींग केले नाही.त्यामुळे अनेक उपनगरांना जोडणारा एकमेव रहदारीचा रस्ता असलेल्या या रस्त्यावरील या खडीमुळे वाहने घसरून पडल्याने अनेक जण जख्मी झाले आहेत.तर ऐन रस्त्याच्या मध्ये भागी अनेक ठिकाणी असलेले चेंबरची झाकणेच गायब असल्याने अतिशय धोकादायक परिस्थीती निर्माण झाली आहे.या परिसरातील नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेवून आपण मुख्याधिकार्‍यंान ठेकेदारावर कारवाई करावी असे पत्र दिले असल्याची माहीती नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके यांनी दिली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव