पंढरी वार्ता:- अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांच्या कृषीपंपाना तातडीने विद्युत कनेकक्शन जोडणीसाठी आ.भारत भालके आक्रमक ! विधानसभेत पटलावर ठेवले अशासकिय विधेयक !

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील अल्प भुधारक व अत्यल्प भुधारक शेतकरी हे महावितरणकडून विद्युत पंपासाठी वीज जोडणी मिळावी यासाठी वर्षानुवर्षे प्रतिक्षा करीत असून या बाबत विविध कारणे पुढे करुन विद्युत जोडणी देण्याबाबत महावितरणच्या संबधीत अधिकार्‍यांकडून चालढकल होत असल्याने या गरीब शेतकर्‍यांचे वर्षा काठी मोठे नुकसान होत आहे.विहरीत पाणी आहे,नदीला पाणी आहे,बंधार्‍यात पाणी आहे मात्र शेतीला देता येत नाही अशी दुर्दैवी वेळ या दोन्ही तालुक्यातील अनेक अल्पभुधारक व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांवर आली आहे.या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर आ.भारत भालके यांनी अनेकवेळा महावितरणच्या अधिकार्‍यांना विविध शासकिय बैठकींच्या वेळी धारेवरही धरले होते.मात्र     महावितरणचे अधिकारी प्रतिसादच देत नसल्यामुळे आ.भारत भालके हये आक्रमक झाले असून थेट विधानसभेत अशासकिय विधेयक मांडून त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नास वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
  अटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने चा गाजावाजा करीत सुरु करण्यात आलेली   योजनाही केवळ कागदोपत्रीच अमलात येत असल्याचे दिसून येत असून सततची नापिकी.. पावसाची अनियमितता.. एक ना अशा अनेक कारणांमुळे शेतीबद्दलची निराशा वाढत चालली आहे. शेतीला केवळ पाणी व उत्कृष्ट निविष्ठा असल्यास शेतकरी आपल्या बळावर उत्पादनातून मोठी वाढ करू शकतो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जेचा उपयोग केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वृद्धी होऊ शकतो.असा कांगावा करीत केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी ही योजना म्हणजे केवळ थोतांड आहे अशी प्रतिक्रिया पंढरपूर -मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी व्यक्त करत आहे. आम्हला विज कनेक्शन द्या आम्हाल जगू द्या अशीच आर्त विनवणी अनेक अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी महावितरणच्या अधिकार्‍याना करीत असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याने आ.भारत भालके यांनी हा विषय थेट विधानसभेत उपस्थित केला आहे.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव