पंढरी वार्ता :- बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंती निमित्त पंढरपूर शहरात बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी  ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे यांचे शुभहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष भाई किशोर भोसले, संभाजी ब्रिगेड चे शहर सचिव विशाल आर्वे, पंढरपूर शहर मध्यवर्ती शिव जन्मोत्सव सोहळा समितीचे सचिव सारंग दिघे,शालिवाहन कोळेकर,संजय सावंत,बापुसाहेब गायकवाड,महादेव खंडागळे,युवराज फरकांडे 
,एकनाथ माने, नागनाथ माने,डांगे,हरवळकर,तेजस भोसले, आकाश भोसले आदी मान्यवर, शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव