पंढरी वार्ता:- स्व.नारायणराव धोत्रे समाजसेवा मंडळाच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन साजरा
येथील स्व.नारायराव धोत्रे बहुद्देशीय सभागृहात समाजसेवा मंडळाच्या वतीने संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मोठया भक्तीपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी पांडुरंग सह.साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते संत गजानन महाराजांच्या मुर्तीवर गुलालफुले अर्पण करुन महाआरती करण्यात आली.यावेेळी मा.नगराध्यक्ष दगडू धोत्रे,मा.नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे,मा.नगराध्यक्ष सतिश मुळे, मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक संजय निंबाळकर,शंकर देवमारे,विवेक परदेशी,विक्रम शिरसट,धर्मराज घोडके,संजय पाठक,दत्तात्रय धोत्रे ,,सत्यविजय मोहोळकर,पप्पू शिंदे,महेश खिस्ते,प्रविण नागणे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी संत गजानन महाराज यांच्यावर स्व.नारायणराव धोत्रे यांची अपार श्रध्दा होती.व त्यांनी या उत्सावाला पंढरपूरात सार्वजनिक स्वरुप देण्याचे फार मोठे कार्य केले असल्याचे सांगीतले.या उत्सवाच्या निमित्ताने येथील सभागृहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यामहाप्रसादाचा लाभ हजारोच्या संख्येने भाविकांनी घेतला.प्रतीवर्षी स्व.नारायणराव धोत्रे समाजसेवा मंडळाच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.या उत्सवाच्या निमित्ताने आज शहरातील संत गजानन महाराज यांच्यावर अपार श्रध्दा असलेले भक्त मोठया संख्येने या ठिकाणी पुुष्पवृष्टी करण्यासाठी उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे दत्तात्रय धोत्रे यांनी आभार मानले
हा उत्सव उत्साहाने पार पाडण्यासाठी शिवरत्न तरुण मंडळ ज्ञानेश्वर नगर,आदिशक्ती तरुण मंडळ ज्ञानेश्वर नगर,रामजाने तरुण मंडळ डवरी गल्ली,न्यु वडार समाज गणेशोत्सव मंडळ,न्यु वडार समाज नवरात्र महोत्सव तरुण मंडळ व श्री गजानन महाराज भक्त मंडळ न्यु वडार गल्ली यांच्या विविध पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.