पंढरी वार्ता :- बादलकोट येथील अवैध वाळू उपसा व वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई ! महसूल व पोलिसांची संयुक्त करवाई !
तालुक्यातील बादलकोट हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करुन वाहतूक सुरु असताना महसूल व पोलींसाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून सात टिपर व एक जे.सी.बी पकडला असून, 1 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
भीमा नदीपात्रात बेकायदेशीर अवैद्य वाळू उपसाकरुन वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार प्रांतधिकारी सचिन ढोले व सहायक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी पथके तयार केली. मौजे बादलकोट येथे बेकायदेशीर यांत्रिक यारीच्या सहाय्याने अवैद्य वाळू उपसा सुरु असताना, पथकाने छापा टाकून सात टिपर व एक जेसीबी जप्त केला आहे. तसेच संबंधितांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
या धडककारवाईत नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, मंडलाधिकारी सादिक काझी, श्री.ढवळे, औसेकर,तलाठी श्री,शिंदे, श्री.काझी, व्ही.बी.जाधव, श्री.खंडागळे, वाहनचालक विजय घाडगे, योगेश अनंतकवळस यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहभागी होते.
